भारतात विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यातील एक दिव्यांच्या रोषणाईंचा सण म्हणजे दिपावली. हा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीचे पाच दिवस वसूबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या दिवासांत अगदी आनंदाला उधाण येतं. या सणाची लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत असतात. फटाक्यांची आतषबाजी, सगळीकडे दिव्यांची रोषणाई, नवीन पोशाख, मित्रमंडळींच्या गाठीभेटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचा स्पेशल फराळ. दिवाळीमध्ये आपण आपल्या आप्तेष्ठांना दिपावलीच्या शुभेच्छा देतो त्यांना खास भेटही देतो. अशाच भेटवस्तू राजकीय वर्तुळातून कलाकारांना दिल्या जातात. (amruta khanvilkar share instgram story thanks raj Thackeray)
नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू पाठवल्या होत्या. अभिनेत्री श्रेया बुगडेने चाहत्यांबरोबर याचा फोटोही शेअर केला होता. तर आता अभिनेत्री अमृता खानविलकरलादेखील राजकीय वर्तुळातून दिपावलीची खास भेटवस्तू आली आहे.अमृताने नुकताच स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने एका खास डेकोरेट केलेल्या गिफ्टची झलक दाखवली. ही खास भेटवस्तू तिला राजकीय वर्तुळातील दिग्गज नेत्यांकडून आली आहे. ते नेते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आलं आहे. अमृताने या भेटवस्तूचा व्हिडिओ शेअर केला आहे.

राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आलेल्या या खास भेटवस्तूसाठी आनंद व्यक्त करत तिने आभार मानले आहेत. त्यात तिने लिहीलं की, मनापासून, ‘धन्यवाद ! राजसाहेब ठाकरे, शालिनी वहिनी, मिताली आणि अमित ठाकरे अशा शब्दात तिने त्या सुंदर गिफ्टसाठी आभार मानले’.
अमृता खानविलकर व तिचा पती हिमांशू यांनी काही वर्षांपूर्वी ‘नच बलिये’ डान्स शोचा ७वा सिजनचं विजेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर त्यांनी पती हिमांशू व आईबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. अमृताचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट हिट ठरल्यानंतर आता ती संजय जाधव दिग्दर्शित ‘कलावती’ चित्रपटात दिसणार आहे.