आदिपुरुष चित्रपटात झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता

Devdutt Nage , film Adipurush
Devdutt Nage , film Adipurush

मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागेला “देवयानी” या मालिकेत सम्राट या नेगीटिव्ह भूमिकेत आपण पहिले होते. परंतु “जय मल्हार” या मालिकेतून घराघरात पोहोचून देवदत्त नागेनी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ घातली. या मालिकेत देवदत्त अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या “खंडोबा” देवाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या सोबत या मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेत्री सुरभी हांडे देखील होत्या. देवदत्त जिथे कुठे जाईल तिथे याला जुनी माणसे “खंडोबाचं” समजत असतं आता देवदत्त आपल्याला हिंदी सिनेमात हनुमानाची भूमिका करताना दिसणार आहे. (Adipurush new update)

हे देखील वाचा : ‘शूटिंग काळात तरुणाचा मृत्यू’ महेश मांजरेकरांचा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!

“आदिपुरुष” या नावाचा हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर आदिपुरुष या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता देवदत्त नागेनी चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पोस्टर मध्ये देवदत्त सोबत चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसतोय तर बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही सीतेच्या भूमिकेत दिसते आहे. या पोस्टला

त्यांनी या पोस्टला “मंत्रों से बढ़के तेरा नाम जय श्री राम” असे कॅप्शन दिले आहे. तर या पोस्टवर देवदत्तच्या अनेक चाहत्यांनी व मराठी कलाकारांनी “जय श्री राम” म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.(Adipurush new update)

अभिनेता देवदत्त नागे काही दिवसांपासून आदिपुरुष या चित्रपटामुळे चर्चेत आला असून, त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे देवदत्त कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेमध्ये काम करताना दिसला होता. जीव माझा गुंतला या मालिकेच्या शूटवेळी त्याला दुखापत झाल्यामुळे त्यांनी चित्रीकरणामधून ब्रेक घेतला होता. देवदत्त हा सोशलमिडीयावर देखील सतत सक्रिय असून तो आदिपुरुष या चित्रपटाचे काही पोस्टर नेहमी सोशल मीडियावर शेअर करत होता. परंतु आज पोस्ट केलेल्या त्याच्या पोस्टर मधील लूकमुळे प्रेक्षक आता आदिपुरुष या चित्रपटात देवदत्त नागेला हनुमानाच्या भूमिकेत बघायला उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
The Kerala Story Controversy
Read More

१० सीन्स हटवले, ३२००० महिलांचं धर्मांतर?- वाचा नक्की काय आहे ‘द केरला स्टोरी’ कॉंट्रोव्हर्सी

द केरला स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.…
Deepa Chaudhari
Read More

“बायको म्हणून नाही तर त्याची…”,चित्रपट पाहून भारावली दीपा

सध्या सर्वत्र महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट सुरु होण्याआधी या चित्रपटातील गाण्यांची भुरळ प्रेक्षकांना…
Lalit Prabhakar and Rinku Rajguru
Read More

ललितची मिस्ट्री गर्ल आली समोर, रिंकू आणि ललितचा रोमँटिक अंदाज

आज एखाद्या कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट केली की ती पोस्ट अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरते. दोन दिवसांपासून अभिनेता ललित…
TDM Marathi Movie Controversy
Read More

मराठी चित्रपटाची कथा, दिगदर्शकाचं प्रेक्षकांपुढे रडून व्यक्त होणं आणि थिएटर मालकाची मक्तेदारी!भाऊराव कऱ्हाडे याचं भावनिक आव्हान

मराठी चित्रपटाला शो न मिळणं या ही शोकांतिका आजची न्हवे. अनेक चांगले चित्रपट, कथा, गुणी कलाकार यांच्या कष्टाचं…
nivedita saraf pet
Read More

सराफ कुटुंबातील ‘सनी’चा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक व्यक्ती किंवा एकदा प्राणी हा जवळचा असतोच. आज जवळपास प्रत्येक जण हा प्राणी प्रेमी…
Kedar Shindes Emotional Post
Read More

शाहीर साबळेंच्या दुसऱ्या पत्नी भावुक, केदार शिंदेंची पोस्ट लक्षवेधी

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. नातवाने आपल्या आजोबांच्या जीवनपटावर भाष्य करणाऱ्या या कलाकृतीला…