सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि म्हणजेच (प्रभास) जो जागतिक स्तराचा सुपरस्टार आहे ज्याने संपूर्ण देशभरात सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त कमाई करणार्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे प्रभास त्याने बॉलिवूड मध्ये देखील आपलं नाव खूप मोठं केलं त्याचे साऊथ चे सिनेमे फेमस आहेतच त्याचबरोबर त्याचे हिंदी चित्रपट देखील हिट होताना आपल्याला पाहायला मिळतात.(Adipurush new update)
त्याचा नुकताच आदिपुरुष ह्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता त्यामुळे चित्रपटाच्या तारखेमध्ये थोडा बदल करण्यात आला असून या या चित्रपटाच्या काही सीन्समध्ये बदल करण्यात आल्याची बातमी देखील समोर आली या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी नवरात्रीच्या शुभ मूर्तावर माता वैष्णोदेवीचे दर्शन घेत प्रेक्षकांच्या भेटीला 16 जून ला 3D मध्ये प्रदर्शित होंणार असल्याचे समजते.
हे देखील वाचा –उर्फी जावेद ही तृतीयपंथी असल्याचा अभिनेत्याचा दावा पुरावा सादर करणार असल्याचा केला खुलासा

आदिपुरुष या चित्रपटाला प्रचंड विरोध दर्शवण्यात आला. चित्रपटातील काही दृश्यांमुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप काही घटकांकडून करण्यात आला होता. चित्रपटाचं दिगदर्शन मराठी दिगदर्शक ओम राऊत यांनी केले असून त्यामुळे मराठी दिगदर्शकाला पाठिंबा द्या म्हणून मनसे ने देखील आव्हान केले होते.(Adipurush new update)
हे देखील वाचा –‘शूटिंग काळात तरुणाचा मृत्यू’ महेश मांजरेकरांचा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
प्रभास सोबतच या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री कीर्ती सेनॉन, अभिनेता वत्सल शेठ इत्यादी कलाकार दिसणार आहेत शिवाय मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे देखील या चित्रपटात दिसणार आहे.