टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. युट्यूबवर ते व्लॉगच्या माध्यमातून अपडेट देत असतात. नुकताच त्यांनी आईच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात भरती केल्याची माहिती दिली आहे. या व्लॉगमध्ये शोएबने शस्त्रक्रियेचे कारण सांगितले आणि दीपिकानेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती या व्लॉगमध्ये रडतानादेखील दिसली. जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये काय सांगितले आहे ते. (shoaib ibrahim and dipika kakkar vlog)
‘ससुराल सिमर का’ या मालिकेमधून दीपिका व शोएब यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. त्याचवेळी दोघांमध्ये मैत्री झाली होती आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. सध्या दीपिका अभिनयामध्ये सक्रिय नसली तरीही व्लॉगच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. कही दिवसांपूर्वी दीपिकाने ईदच्या दिवशीचे व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.
परंतु आता त्याच्या नवीन व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये शोएबने आपल्या आईला रुग्णालयामध्ये भरती केले आहे. त्याचे त्याने यामागील कारणदेखील चाहत्यांबरोबर शेअर केले आहे. हार्मोन्सच्या समस्या असल्याने आईवर एक लहान शस्त्रक्रिया केली जाणार होती. तसेच याबद्दल सर्व सविस्तरपणे सांगितले जाईल असेही शोएबने सांगितले. तसेच हि शस्त्रक्रिया लहान असली तरीही भूल देण्यात येणार असून याचा परिणाम 10 ते 12 तास त्यांच्यावर राहू शकतो असेही शोएबने स्पष्ट केले.
तसेच याबद्दल दीपिकाने सांगितले की, “सासूबाईंना मेडिकल चेकअपसाठी आणले जाते तेव्हा आम्हाला खूप काळजी वाटते ही तर शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा खूप कठीण प्रसंग आहे. तसेच शोएबच्या आईच्या शस्त्रक्रियेबद्दल विचार करुनदेखील रडायला येते. त्यामुळे शोएब खूप चिंतेत आहे.”
काही दिवसांपूर्वी दीपिका व शोएब यांनी मुलगा रुहानच्या तब्येतीबद्दलदेखील एक अपडेट दिली होती. त्यावेळी रुहानची तब्येत ठीक नसल्याने कोणतेही व्हिडीओ शूट करु शकत नाही असे त्यांनी चाहत्यांना सांगितले होते. त्यानंतर तो बरा असल्याचीदेखील त्यांनी माहिती व्लॉगच्या माध्यमातून दिली होती.