महेश मांजरेकर एक भारतीय चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि निर्माता आहेत.त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले असून . दिग्दर्शना शिवाय त्यांनी स्वत: च्या काही प्रॉडक्शनसह अनेक चित्रपटांमध्ये पण काम केले आहे . महेश मांजरेकरांचा वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून त्या मध्ये महेश मांजरेकरांनी बिगबॉस तीन चे कलाकार घेतले आहे त्याबरोबर त्यांचा फर्स्ट लुक चा पोस्टर देखील रिलीस झाला असून बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.(Mahesh Manjrekar Movie Controversy)
नक्की काय घडलं होत तिथे(Mahesh Manjrekar Movie Controversy)
चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूर मध्ये सुरु असताना पन्हाळा किल्ल्यावरील तटबंदी घोड्यांची पागा बांधण्यात आली होती. तिथे घोडयांची देखभाल करण्यासाठी नागेश खोबरे या व्यक्तीची निवड करण्यात आली होती तेव्हा अंधारामुळे लक्ष न गेल्याने नागेश खोल दरीत कोसळला. लक्षात येताच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण दुर्दयवाने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नागेशच्या नातेवाईकांनी आता न्यालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याच कारण असं कि नागेश चा उपचाराचा खर्च चित्रपट निर्मात्यांकडून देण्यात आला नाही.
हे देखील वाचा –आणि शूटिंग दरम्यान सायली-अर्जुनाचा झाला होता अपघात सेटवर सगळ्यांची अशी होती रिऍक्शन!
महेश वामन मांजरेकर दिग्दर्शिक या सिनेमात प्रवीण तरडे प्रतापराव गुजर ,यांची भूमिका साकारणार असून या सिनेमात महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबरोबर सत्या व दत्ताजी पागे यांच्या भूमिकेत दिसेल व ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘राणादा’ अर्थात हार्दिक जोशी मल्हारी यांची भूमिका साकारणार आहे. विराट मडके जिवाजी पाटील यांची भूमिका साकारत आहे.व बिग बॉस मराठी सीजन ३ मधील स्पर्धक आणि गायक उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांची भूमिका त्यांनी साकारलेली आपल्यला दिसणार असून.(Mahesh Manjrekar Movie Controversy)
बिग बॉस मराठी सीजन ३ चा विजेता विशाल निकम हा चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत आणि बिग बॉस मराठी ३ चा स्पर्धक जय दुधाणे तुळजा जामकर यांच्या भूमिकेत आहे.तर यावेळी चित्रपटामधील सात कलाकारांच्या मुख्य भूमिका आणि त्यांच्या लूकबाबतही सांगण्यात आलं. तर या चित्रपटामधील सात वीरांची नावं बदलण्याचा आरोप महेश मांजरेकर यांच्यावर करण्यात आला असून या वादादरम्यान चित्रपटामध्ये एका नव्या अभिनेत्री एंट्री झाल्याचे आपल्याला दिसणार आहे.
हे देखील वाचा –गर्भवती अभिनेत्रीला धो धो पाऊसात ही निळू फुलेंनी केली होती मदत