महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील मधुमास बहरला या गाण्याने तर सोशल मीडियावर चांगलाच कल्ला केला आहे. हे गाणं ट्रेंडिंगमध्ये सुरु असून सध्या सगळेच कलाकार या गाण्यावर रिल्स करताना दिसून येत आहेत. या गणयावर रिल्स करण्याचा मोह रंग माझा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे हिला देखील आवरला नाही. रेश्माने या गाण्यावर रिल्स बनवत हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र या गाण्यावर रिल्स केल्यामुळे रेश्मा शिंदेला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.(reshma shinde troll)
पहा काय म्हणाले नेटकरी (reshma shinde troll)
एका नेटकऱ्याने रेश्माच्या या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, “तू जरा जास्तच डान्स केलास.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलंय, “तू डान्स चांगला केलास पण ती गरबा स्टेप वाटली.” तर एका नेटकऱ्याने लिहिलंय, “तुझा नाच परफेक्ट नव्हता.” तर काहींनी “तुला खरंच नाही जमलाय हा डान्स” असे म्हणत रेश्माची खिल्ली उडवली आहे. आता या व्हिडिओमुळे रेश्मा पुन्हा चर्चेत आली आहे.

आधीच रेश्माला रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा या भूमिकेतील तिच्या पात्राच्या मेकअपवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत. आता मात्र तिला एका गाण्यावर केलेल्या रिल्स मुळे ट्रोल करण्यात आले आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.(reshma shinde troll)
हे देखील वाचा – नृत्य सादर करत उर्मिलाने दिल्या रामनवमीच्या दिल्या शुभेच्छा
या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहिरांच्या भूमिकेत आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदे ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय. या सिनेमात तिच्यावर चित्रित झालेलं ‘बहरला हा मधुमास नवा..’ हे गाणं सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आलं आहे. या गाण्यावर मराठीतल्या सेलिब्रिटींनीही रील्स बनवले आहेत. चित्रपटातल्या या गाण्याने तर सोशल मीडियावर धुमाकूळच घातला आहे. येत्या २८ एप्रिलला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज होणार आहे.
