सिनेसृष्टीतील काही कार्यक्रम हे रोजच्या जीवनाचा घटक असल्यासारखे असतात. अशात सर्वोच्च स्थानावर असलेल्या कार्यक्रमाचं नाव सांगायचं म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने आजवर साऱ्या प्रेक्षक वर्गाला खळखळून हसवलं आहे. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. अशातच हास्यजत्रेतील दादूस म्हणजे अभिनेते अरुण कदम यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच. उत्तम अभिनयशैली, आगरी कोळी भाषा, विनोदाचं अचूक टायमिंग साधत अरुण कदम यांनी आजवर सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं. (Arun Kadam New Post)
अरुण कदम यांनी त्यांच्या विनोदाने आजवर सगळ्यांनाच हसवलच आहे. सोशल मीडियावर ही त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अरुण कदम यांनी सोशल मीडियावरून पत्नीसाठी केलेली खास पोस्ट लक्षवेधी ठरतेय. अरुण कदम यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि कॅप्शन देत त्यांनी त्यांची पत्नी वैशाली साठी खास पोस्ट देखील लिहिली आहे.
पाहा अरुण कदम यांची पत्नीसाठीची ती पोस्ट (Arun Kadam New Post)
या पोस्ट मध्ये अरुण कदम यांनी लिहिलंय, वैशाली आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुला जाम भारी शुभेच्छा, बायका नेहमीच म्हणतात (वड पुजताना) सात जन्म हाच पती मिळावा. सात जन्माचं माहीत नाही पण येणाऱ्या प्रत्येक जन्मात तुझ्या मनातली प्रत्येक ईच्छा मला पुर्ण करता येवो हीच प्रार्थना. कॅप्शन मध्ये अरुण यांनी त्यांच्या पत्नीचे भरभरून कौतुक केलं आहे.(Arun Kadam New Post)
हे देखील वाचा – बँकेत नोकरी करताना इतक्या पैशात अशोक मामा काढायचे महिना
अरुण कदम यांच्या या पोस्ट वर महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षांव केला आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातून अरुण कदम यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शिवाय त्यांनी अनेक चित्रपट नाटकांमध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आगरी कोळी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या अरुण यांनी या भाषेच्या जोरावर आपली विनोदशैली जपली.

केवळ कॉमेडी शो नाही तर त्यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला उत्तमरीत्या हाताळलं आहे. इतकंच नाही तर मराठी सिनेसृष्टीसोबत त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केलं आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. बायपास, दिल तो बच्चा है जी, काफिला यांसारख्या हिंदी चित्रपटात अरुण यांना पाहणं रंजक ठरलं.