बँकेत नोकरी करताना इतक्या पैशात अशोक मामा काढायचे महिना

Ashok Saraf Working Incidence
Ashok Saraf Working Incidence

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. संघर्ष करून ती व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचतेच. असेच संघर्ष करणाऱ्या व्यक्तीने बऱ्याच संकटांना सामोरं जाऊन यश मिळवलेलं असत. अशातच सिनेविश्वातील एका व्यक्तीच नाव आवर्जून घेतलं जात ती व्यक्ती म्हणजे अभिनेता अशोक सराफ होय. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी प्राण ओतून भूमिका करणारे मामा सगळ्यांचेच लाडके आहेत. सरळ साधी भूमिका असो, वा खलनायक असो, नायक असो वा एवढी विनोदी भूमिका असो अशोक मामांनी प्रत्येक भूमिका जगली आहे, आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सिनेविश्वात काम करणं हे अशोक मामांचं स्वप्न जरी असलं तरी वडिलांच्या इच्छेखातर सिनेसृष्टीत काम करण्याआधी अशोक मामांनी वेगळ्या क्षेतारत करिअरची सुरुवात केली. (Ashok Saraf Working Incidence)

photo credit : google

सिनेसृष्टीत करिअर करणं हे मामांचं स्वप्न असूनही अभिनयाची आवड असणारे मामा करिअरच्या सुरुवातीला बँकेत काम करायचे. बँकेत काम करताना मामांना किती पगार होता हे फार कमी जणांना ठाऊक असेल.   अशोक मामा बँकेत काम करण्यासोबतच नाटकातही काम करायचे. बँकेची नोकरी सांभाळत त्यांनी रंगमंचावर ही काम केलं. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी बँकेत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती त्यांनी मी बहुरूपी या पुस्तकात दिली आहे. मामा जेव्हा बँकेत काम करायचे तेव्हा त्यांना महिन्याला २३५ रुपये पगार मिळायचा.

पाहा अशोक मामांच्या पगाराबद्दल थोडक्यात (Ashok Saraf Working Incidence)

आपल्याला मिळालेल्या या पगारातील २०० रुपये ते घरी द्यायचे. उरलेल्या ३५ रुपयात ते आपला महिन्याचा खर्च भागवायचे. वेगवेगळे सिनेमे पाहायला मिळावे यासाठी त्या ३५ रुपयांमध्येही बचत करायचे. बँकेच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये १० पैशांना पाव मिळायचा आणि १५ पैशांची पातळ भाजी मिळायची. मामा गुपचूप जाऊन ते खाऊन यायचे. हेच त्यांचं दुपारचं जेवण असायचं. त्यानंतर काही वर्षांनी अखेर मामांनी ती नोकरी सोडली आणि कायमचा अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला.(Ashok Saraf Working Incidence)

हे देखील वाचा – ‘विनोदात रंजना अशोकला भारी पडते’ खुद्द अशोक मामांनीच केला खुलासा

अशोक मामांच्या अनेक गोष्टी आज ऐक्याला आपल्याला आवडतायत मात्र यामागे त्यांची असलेली मेहनत थक्क करणारी आहे. हल्लीच त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ही त्यांची निरागसता पाहणं रंजक ठरलं. अशोक मामांचे बरेच चाहते आहेत तसेच सिनेसृष्टीत ते बऱ्याच कलाकारांचे प्रेरणास्थान आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Suniel Shetty Struggle
Read More

“तू जाऊन इडल्याचं विक” पहिल्या चित्रपटानंतर बॉलीवूड मध्ये आण्णा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील शेट्टींवर झालेली टीका

आपल्या पहिल्या कामाचं एकतर कौतुक केलं जात किंवा त्याला नाव ठेवली जातात पण त्यातून आपण शिकतोय कि खचून…
Alka Kubal Ashalata Wagbaonkar
Read More

“मी गेल्या नंतर माझे अंत्यसंस्कार तूच कर” अलका कुबल यांनी आशालता यांना दिल होतं वचन

कोरोना हा काळ आपल्या सर्वांसाठीच त्रासदायक होता. अनेक जवळच्या व्यक्तींना गममाव लागलं होतं. अनेक कलाकार मंडळींनीही कोरोना काळात…
Nivedita Saraf Jhapatlela
Read More

‘मला लग्न झालेली बाई माझ्या चित्रपटात नको आहे’ कोठारेंनी झपाटलेला मध्ये निवेदिता यांना नाकारला रोल

जस प्रेक्षकांना मनोरंजनासाठी विविध कथांची, कलाकारांची जमजुळणी पाहायला आवडत त्याच प्रमाणे एखादा दिगदर्शक नेहमीचं त्याच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग…
Ashok Saraf Monkey Attack
Read More

आणि खांद्यावरच्या माकडाने अशोक सराफ यांना सणसणीत टपली मारली

दोन अफाट विनोदबुद्धी असलेले कलाकार एकत्र आले कि अप्रतिम कथेची निर्मिती होते याचं एक उत्तम उदाहरण असलेली एक…
Lakshmikant Berde Friendship
Read More

लक्षाच्या जाण्याने या अभिनेत्याने सोडली रंगभूमी, पाहा कोण आहे तो अभिनेता

लोकप्रिय मराठमोळे अभिनेते दीपक शिर्के यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि दीपक शिर्के यांच्या शिवाय…
Struggle Story Gaurav More
Read More

‘न सांगता एकांकिकेतून झालेली हकालपट्टी ते आज स्वतःच निर्माण केलेले स्थान’ वाचा फिल्टर पाड्याच्या बच्चन गौरव मोरेची स्ट्रगल स्टोरी

मंडळी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘लहरो से डरकर नैय्या पार नहीं होती, कोशिश करने वालो कि कभी हार…