शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील, बहिण, भाचीने दिल्या वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा, मात्र बायकोने फिरवली पाठ, ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये पुन्हा बिनसलं?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2024 | 5:17 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actor Abhishek bachchan sister Shweta and niece navya wished birthday but not aishwarya rai

वडील, बहिण, भाचीने दिल्या वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा, मात्र बायकोने फिरवली पाठ, ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये पुन्हा बिनसलं?

आज ५ जानेवारी २०२४, बॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील अभिनेता अभिषेक बच्चनचा वाढदिवस. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय, कलाविश्वातील कलाकार मंडळी तसेच त्याच्या असंख्य चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, अभिषेकची बहीण श्वेता बच्चन व भाची नव्या नवेली नंदा यांनीदेखील त्यांच्या भावासाठी व मामासाठी वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सकाळीच लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

अभिषेकची बहीण श्वेता नंदा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्याबरोबरचा बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघे भाऊ-बहीण पलंगावर बसून मिठाईचा आस्वाद घेताना दिसत आहे. या फोटोबरोबरच आपल्या धाकट्या भावासाठी तिने एक खास पोस्टही लिहिली आहे.  यात तिने असं म्हटलं आहे की, “जर तुला माहित असेल, तर तुला माहीत आहे, फक्त तुला माहीत आहे ते मलाही माहीत आहे. आज तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे आणि या दिवसांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला खूप सारे प्रेम.”

View this post on Instagram

A post shared by S (@shwetabachchan)

आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली, ‘या’ महिन्यात घरी येणार नवा पाहुणा, कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण

अभिषेकची भाची नव्या नवेली नंदानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्याने तिच्या मामाचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे, त्यात स्वत: अगस्त्य नंदा नव्या दिसट आहेत. हा फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “सगळ्यांच्या आवडत्या, विशेषतः माझ्या सर्वात जास्त आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” तसेच अमिताभ बच्चन यांनीही अभिषेकला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – सई ताम्हणकरची संपत्ती किती?, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दिले खुलेपणाने उत्तर, म्हणाली, “तुम्हाला…”

दरम्यान, या सगळ्यात सोशल मीडियावर सध्या वेगळीच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे पत्नी ऐश्वर्याकडून अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त काहीच पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर अभिषेकच्या कुटुंबातील सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्याची पत्नी ऐश्वर्या रायने अद्याप तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या व अभिषेक वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अशातच ऐश्वर्याने नवऱ्याला शुभेच्छा न दिल्यामुळे आता आणखी चर्चांना तोंड सुटले आहे.

Tags: abhishek bachchanAISHWARYA RAIbollywood actorbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsअभिषेक बच्चनऐश्वर्या रायबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Anant Ambani-Radhika Wedding

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधींमध्ये नाचणार आलिया भट्ट-रणबीर कपूर, तयारी करतानाचा व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.