एखाद्या प्रसिद्ध किंवा लोकप्रिय व्यक्तीबाबतच्या प्रत्येक अपडेट्ससाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. त्याच्याविषयी सगळेच जाणून घेणे ही चाहत्यांना कायमच आवडत असते. अशीच एका व्यक्तीविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनी गेले अनेक दिवस उत्सुकता दाखवली आहे आणि ही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा. गेले काही दिवस अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहेत.
अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. अद्याप अभिनेत्रीने किंवा विराट कोहलीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण विराटचा मित्र व दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू एबी डिव्हिलियर्सने अनुष्काच्या प्रेग्नन्सीबाबत भाष्य केलं आहे. सध्या सोशल मीडियावर एबी डिव्हिलियर्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने अनुष्का-विराटच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीबाबत भाष्य केलं आहे.
AB De Villiers said, "Virat Kohli and Anushka Sharma are expecting their 2nd child, so Virat is spending time with his family". (AB YT). pic.twitter.com/qurRKnFK1q
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 3, 2024
विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्सने एका युट्यूब लाइव्हमध्ये असं म्हटलं की, “विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे, त्यामुळेच तो पहिले दोन कसोटी सामने खेळत नाही. मी सध्या इतर कशाबद्दल भाष्य करू शकत नाही. मी एवढेच म्हणेन की, होय अनुष्का-विराट लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. विराटसाठी कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. त्याने योग्य निर्णय घेतला आहे.”
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीचे दुसरे अपत्य सप्टेंबर 2024 पर्यंत होऊ शकते. अनुष्का नोव्हेंबर 2023 मध्ये बेबी बंपसह दिसली होती परंतु लोकांनी याला अफवा म्हटले. 22 जानेवारी रोजी, विराट आणि अनुष्का रामलाला प्राण प्रतिष्ठाच्या वेळी एकत्र दिसले होते जेव्हा अभिनेत्री तिचे बेबी बंप लपवत होती.
आणखी वाचा – सई ताम्हणकरची संपत्ती किती?, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दिले खुलेपणाने उत्तर, म्हणाली, “तुम्हाला…”
दरम्यान, विराटया-अनुष्का ही दोघे त्यांच्या लेकीविषयी अगदीच गोपनीयता जप्त असल्याचे पाहायला मिळाले आहे. अनुष्का-विराट यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्काने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव वामिका असे ठेवण्यात आले. त्यानंतर विराट-अनुष्काच्या दुसऱ्या अपत्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.