उद्योगपती मुकेश अंबानी व पत्नी नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. अनंत राधिका मर्चंटसह सात फेऱ्या घेण्यास सज्ज झाली आहे. दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनचे कार्डही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या कार्डमध्ये दोघांचे प्री-वेडिंग कार्यक्रम १ ते ३ मार्चदरम्यान होणार आहेत. (Anant Ambani-Radhika Wedding)
अंबानी कुटुंबाच्या या भव्य लग्नात आता बॉलीवूड कलाकारदेखील धमाल करताना दिसणार आहेत. अनंत व राधिकाच्या लग्नापुर्वीच्या कार्यक्रमात रणबीर कपूर व आलिया भट्ट जबरदस्त परफॉर्मन्स देणार असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय या जोडप्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे ज्यामध्ये ते अंबानी कुटुंबाच्या घरी जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ रणबीरच्या फॅन पेजने पोस्ट केला आहे. यावरुन रणबीर व आलिया त्यांच्या डान्स प्रॅक्टिससाठी अंबानी हाऊसमध्ये पोहोचले असल्याची चर्चा आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. गेल्या वर्षी या जोडप्याचा साखरपुडा संपन्न झाला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अनंत व राधिकाच्या शाही विवाहसोहळ्यसाठीही कलाकार मंडळी जोरदार तयारी करत आहेत. अनंत व राधिकाच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण या जोडप्याचे लग्नापूर्वीचे विधी १ ते ३ मार्चदरम्यान सुरु राहणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या मूळ गावी जामनगरमध्ये अनंत व राधिकाच्या लग्नाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
रणबीर कपूर व आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे.