शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : फुलांचे दागिने, पारंपरिक लूक अन्…; आमिर खानच्या लेकीचा केळवणाचा कार्यक्रम, होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला उखाणा, म्हणाली, “आता मला…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 8, 2023 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
ira khan and nupur shikhare second Kelvan functions

Video : फुलांचे दागिने, पारंपरिक लूक अन्...; आमिर खानच्या लेकीचा केळवणाचा कार्यक्रम, होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला उखाणा, म्हणाली, "आता मला..."

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान व तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. पुढील वर्षी ३ जानेवारीला हे जोडपं कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न करणार आहे. त्यानिमित्त दोघांच्या घरी लग्नापुर्वीच्या कार्यक्रम सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी आयरा व नुपूरच्या पहिल्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला होता, ज्याच्या फोटोजची बरीच चर्चा झाली होती. आता दोघांच्या दुसऱ्या केळवणाचा कार्यक्रम नुकतंच पार पडला. ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (ira khan and nupur shikhare second Kelvan functions)

आयराचा भावी पती नुपूर शिखरे हा महाराष्ट्रीयन कुटुंबातील आहे. त्यामुळे लग्नाआधी किंवा लग्नानंतर या महाराष्ट्रीयन कुटुंबात केळवणाचा कार्यक्रम पार पडला जातो. ज्यात नवविवाहित वधू-वरांना व त्यांच्या पालकांना एकत्र जेवणासाठी आमंत्रित करतात. तसेच त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. पहिल्या केळवणाप्रमाणे हाही कार्यक्रम अतिशय साध्या रीतीने पण धुमधडाक्यात पार पडला. यावेळी आयराची आई रिना दत्ता व दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित होते. तसेच यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू देत त्यांना आशीर्वाद दिले.

हे देखील वाचा – “हमारे इस वर्दी का गौरव हमेशा रहेगा…”, बहुचर्चित ‘सॅम बहादूर’चा दमदार ट्रेलर समोर, विकी कौशलच्या दमदार अंदाजाचं होतंय कौतुक

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयराने या सोहळ्याचे काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. ज्यामध्ये हे दोघे पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते. आयराने या सोहळ्याला लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यावर फुलांचे दागिने आणि केसांत गजरा यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तर नुपूर पिवळ्या रंगाच्या कुर्ता व पायजमामध्ये अतिशय देखणा दिसत होता. या फोटोजमध्ये दोघे एकमेकांना मोठी मारताना दिसत असून दोघांच्या चेहत्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे. तर याच फोटोजमध्ये एक व्हिडीओसुद्धा शेअर करण्यात आला. ज्यामध्ये आयरा उखाणा घेताना दिसत आहे. दोघांच्या पुढ्यात महाराष्ट्रीयन पद्धतीचं पंचपक्वान्न दिसत आहे. ज्यात हे दोघे एकमेकांना घास भरवताना दिसले. यावेळी आयराने “आता मला मराठी येते. आणि मी पॉपॉयला घेऊन जाते”, असा सुंदर उखाणा घेतला.

हे देखील वाचा – तुळशीला पाणी घालत होते अमिताभ बच्चन, एक चूक घडली अन्…; नेटकऱ्यांनी कमेंट करत व्यक्त केला संताप

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

या केळवण सोहळ्याचे फोटोज जोरदार व्हायरल होत आहे. यावेळी दोघांच्या मित्रमंडळींसह चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आयराचा भावी पती नुपूर हा सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक असून त्याने अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. गेल्या अनेक वर्षांपासून आयरा नुपूरकडून फिटनेसचं प्रशिक्षण घेते. त्याचदरम्यान, हे दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. ३ जानेवारी २०२४ रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर ते उदयपूरला डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाणार आहेत. या सोहळ्यानंतर आमिरने खास लेकीसाठी मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत.

Tags: aamir khanbollywood newsira khanira khan and nupur shikhare second Kelvan functionsira khan pre-wedding ceremoniesnupur shikhare
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Honey Singh Divorce

लग्नाच्या १३ वर्षांनी हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप, म्हणाली, "त्याने मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.