सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक चाहत्यांशी संवाद साधणं कलाकार मंडळींसाठी अगदी सहज शक्य झालं आहे. कित्येक कलाकार मंडळी तर अगदी नेहमी कामामधून वेळ काढत व्हिडीओ, फोटो शेअर करतात. पण बऱ्याचदा कलाकारांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असंच काहीसं आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबत घडलं आहे. अमिताभ यांची सोशल मीडियावर प्रचंड मोठी फॅन फॉलोविंग आहे. मात्र अमिताभ सध्या त्यांच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. (Amitabh Bachchan Trolled For Watering Plant Wrong Way)
सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात ट्रोलिंगसारखे प्रसंग कलाकारांसाठी तसे नवीन नाहीत. अशातच अमिताभ यांना ट्विटरवरील एका फोटोमुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते तुळशीला पाणी घालत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘तुलसी पे जल, प्रतिदिन’ असे म्हटले आहे. मात्र या फोटोतील एका चुकीमुळे त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.
आणखी वाचा – ४० वर्षांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होत्या झीनत अमान, डोळ्यांवर झाली शस्त्रक्रिया, लूकही बदलला अन्…
T 4822 – तुलसी पे जल, प्रतिदिन ???????? pic.twitter.com/0gqEBT4l7D
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 5, 2023
अमिताभ यांनी तुळशीला डाव्या हाताने पाणी घातल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एका युजरने असे म्हटले आहे की, “सर, पाणी दोन्ही हातांनी दिले जाते”. दुसर्या युजरने लिहिले आहे की, “दररोज? रविवारी तुळशीला पाणी देत नाहीत”. तर आणखी एका युजरने असे म्हटले आहे की, “कोणतीही पूजा करताना डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताने करावी”. अशा अनेक प्रतिक्रिया या फोटोखाली नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
आणखी वाचा – रश्मिका मंदानापाठोपाठ कतरिना कैफही डिपफेक व्हिडीओची शिकार, विचित्र कपडे परिधान केलेला अश्लील फोटो व्हायरल
अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात त्यांना सोशल मीडियाचे व्यसन लागल्याचे कबूल केले होते. “सोशल मीडियावर ब्लॉग्स शेअर केल्यानंतर प्रत्येकाला उत्तर देता देता एक-दोन तास कसे निघून जातात हे कळतच नाही” असे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले होते.