शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या १३ वर्षांनी हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप, म्हणाली, “त्याने मला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 8, 2023 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Honey Singh Divorce

लग्नाच्या १३ वर्षांनी हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप, म्हणाली, "त्याने मला…"

गायक, रॅपर हनी सिंग सध्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. हनी सिंग त्यांच्या पत्नीबरोबरच्या घटस्फोटामुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी दिल्ली न्यायालयाने गायक, रॅपर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांच्या लग्नाच्या तब्बल १३ वर्षानंतर घटस्फोट मंजूर केला. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, परमजीत सिंग, प्रधान न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय यांनी या प्रकरणात दाखल केलेल्या दुसऱ्या प्रस्तावाला परवानगी दिली. यामुळे सुमारे अडीच वर्षांच्या या खटल्याला पूर्णविराम मिळाला आहे. (Honey Singh Divorce)

हिंदू विवाह कायद्यानुसार, घटस्फोटाची याचिका दाखल केल्यापासून सहा ते अठरा महिन्यांच्या कालावधीनंतर दुसरा प्रस्ताव मांडला जातो. दरम्यान हनीचे वकील ईशान मुखर्जी यांनी याबाबत हवाला देत म्हटलं की, “दुसरा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे आणि घटस्फोटाचा आदेश जारी करण्यात आला आहे.” खाजगी वैवाहिक प्रकरणांतर्गत हे येत असल्याने ईशानने अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

आणखी वाचा – Video : फुलांचे दागिने, पारंपरिक लूक अन्…; आमिर खानच्या लेकीचा केळवणाचा कार्यक्रम, होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला उखाणा, म्हणाली, “आता मला…”

जानेवारी 2011 मध्ये हनीने शालिनी तलवारसह लग्न केले आणि लग्नाच्या ११ वर्षानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ब अंतर्गत कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने याचिका स्वीकारत त्यांना सहा महिन्यांचा कालावधी दिला. हनी सिंगची पत्नी शालिनीने तक्रार करत म्हटलं होतं की, “हनीने मला मारहाण केली आहे. तसंच माझ्या कुटुंबावर त्याने मानसिक व भावनिक आघात केले आहेत. तसेच माझ्या कुटुंबाकडून पैसेही उकळले आहेत.” गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हनी सिंगने त्याची पत्नी शालिनी तलवारला १ कोटींचा डिमांड ड्राफ्टही सोपवला होता.

आणखी वाचा – “हमारे इस वर्दी का गौरव हमेशा रहेगा…”, बहुचर्चित ‘सॅम बहादूर’चा दमदार ट्रेलर समोर, विकी कौशलच्या दमदार अंदाजाचं होतंय कौतुक

ऑगस्ट २०२१ मध्ये, शालिनीने दिल्ली येथील हजारी न्यायालयात धाव घेतली आणि हनी सिंगविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी हनी सिंगने सोशल मीडियावरून त्यावर लादलेल्या आरोपाबाबत भाष्य केलं. हे आरोप ‘अभद्र’,’खोटे’ व ‘दुर्भावनापूर्ण’ असल्याचं त्यांनी म्हटलं. २०११ मध्ये हनी सिंग आणि शालिनी तलवार या दोघांनी दिल्लीच्या एका गुरुद्वारामध्ये शीख रिती रिवाजांनुसार लग्न केलं. दोघांनी कुटुंबांच्या उपस्थितीत हे लग्न गुपचूप पार पाडलं.

Tags: bollywood singerentertainmenthoney singhoney singh divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Sushmita Sen Rohman Shawl

आधी ललित मोदी आता पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात आहे सुष्मिता सेन, दिवाळी पार्टीमध्ये हातात हात घेतला अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.