सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गौतमी देशपांडेच्या लग्नात ‘लफडी’ शब्द झाला ट्रेंड, मृण्मयीला नेटकऱ्याने त्याचबाबत विचारला प्रश्न, उत्तर देत म्हणाली, “तो सारखं बोलतो की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 29, 2023 | 12:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gautami Deshpande and Swanand Tendulkar

गौतमी देशपांडेच्या लग्नात 'लफडी' शब्द झाला ट्रेंड, मृण्मयीला नेटकऱ्याने त्याचबाबत विचारला प्रश्न, उत्तर देत म्हणाली, "तो सारखं बोलतो की…"

‘माझा होशील ना’ फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गेले बरेच दिवस गौतमीच्या लग्नाची लगबग सर्वत्र सुरु असलेली पाहायला मिळाली. लोकप्रिय कन्टेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरसह ती लग्नबंधनात अडकली आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून गौतमीने आपल्या अभिनयातील प्रवासाची सुरुवात केली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आता अखेर तिला तिच्या खऱ्या आयुष्यातील आदित्य भेटला आहे. (Gautami Deshpande and Swanand Tendulkar)

गौतमीच्या लग्नसोहळ्याने सोशल मिडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, व कुटुंबियांच्या उपस्थितीत खडकवासला पुणे येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांनी त्यांचं लग्न उरकलं. अगदी शाही थाटामाटात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. गौतमी-स्वानंदच्या मेहंदी, हळदी समारंभाच्या फोटोंनीही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. गौतमी-स्वानंदच्या लग्नसोहळ्यात आणखी एक विशेष बाब म्हणेज लग्नासाठी त्यांनी वापरलेले हॅशटॅग.

आणखी वाचा – दिसायला हॉट, श्रीमंत अन्…; स्पृहा जोशीने केला पुढील पाच वर्षांच्या प्लॅन्सचा खुलासा, म्हणाली, “मी आणखी…”

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या नावावरून #swag हा हॅशटॅग वापरुन फोटो शेअर केले होते. याशिवाय लगीनघाई सुरु झाल्यापासून आणखी एक हॅशटॅग त्यांच्या फोटोंबरोबर होता तो म्हणजे #lafdi . #lafdi हा हॅशटॅग नेमकं काय प्रकरण आहे असा प्रश्न गौतमीच्या चाहत्यांना पडला होता. अखेर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे चाहत्यांच्या या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे. #lafdi वरुन आलेल्या प्रश्नावर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे. एका चाहतीने मृण्मयीच्या पोस्टवर कमेंट करत, “#lafdi चा नेमका अर्थ काय आहे?” अशी कमेंट केली. यावर उत्तर देत मृण्मयी म्हणाली, “स्वानंद तेंडुलकरला विचार. मलासुद्धा माहित नाही. पण तो सारखा बोलत असतो लफडी नकोत” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “मला भरून आलं”, शिखर धवनला अक्षय कुमारने दिला आधार, म्हणाला, “मुलांना भेटता न येण्याइतकं…”

गौतमीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर रोमँटीक पोज देत तिच्या मेहेंदी समारंभानिमित्त पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याचा खुलासा केला. याआधी गौतमी व स्वानंद यांच्या नात्याची चर्चा सुरु होती मात्र दोघांनीही त्यांच्या लग्नापूर्वी त्यांच्या नात्याचा खुलासा केला नव्हता.

Tags: gautami deshpandegautami deshpande and swanand tendulkar weddingmarathi actressmrunmayee deshpandeswanand tendulkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
Pooja Sawant Bride Too Be Celebration

धमाल-मस्ती, डान्स अन्…; गोव्याच्या किनाऱ्यावर पूजा सावंतची Bride To Be पार्टी, प्रार्थना बेहरेची नवऱ्यासह हजेरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.