शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चांगल्यासाठीच नातं संपलं अन्…”, आमिर खानच्या घटस्फोटावर लेकीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “एकमेकांवर प्रेम पण…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 30, 2024 | 2:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ira khan on aamir khan divorce

आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या इरा खानवर काय परिणाम झाला?

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमीच खूप चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही तो अधिक चर्चेत राहिला आहे. आमिर खान दोन वेळा लग्नबंधनात अडकला. १९८६ साली तो रिना दत्ताबरोबर लग्नबंधनात अडकला मात्र २००२ साली दोघंही वेगळे झाले. रिना व आमिर यांना इरा व जुनैद अशी दोन मुलं आहेत. इरा गेल्या वर्षी नूपुर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. इरा एका हेल्थ सपोर्ट ऑर्गनायजेशनची संस्थापिका आहे. मानसिक आरोग्याबद्दल ती लोकांना सावध करते. नुकतेच तिने आमिर व रिना यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. (ira khan on aamir khan divorce)

इराने नुकताच ‘पिंकविला’बरोबर संवाद साधला. यामध्ये तिने आमिर व रिना यांच्या घटस्फोटाचा मनावर काय परिणाम झाला? याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, “दोघांनी आमच्यासमोर कधीही भांडण केले नाही. त्यांनी नेहमी मुलांसाठी एकत्रित काम केले. आमच्यापासून भांडणं नेहमी लांब ठेवली. सर्व बाबतीत त्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. एक कुटुंबं म्हणून ते नेहमी एकमेकांवर प्रेम करत होते”.

आणखी वाचा – “एवढं करण्यापेक्षा पार्लरमध्ये जा”, घरीच ऐश्वर्या नारकरांनी केले स्वतःचे Eyebrow, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “या ट्रिकमध्ये…”

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

पुढे इरा म्हणाली की, “आई-बाबांच्या घटस्फोटाचा माझ्यावर तसा काही जास्त परिणाम झाला नाही. मी मोठी झाले तेव्हा मला वाटलं की हे नातं चांगल्यासाठीच संपलं असावं. सत्यामुळे त्यामुळे एक इतकं आम्ही दु:ख वाटून घेतलं नाही”. आमिर व रिना यांच्या घटस्फोटाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला? यावर इरा म्हणाली की, “मी माझ्या डॉक्टरबरोबर या सगळ्यावर चर्चा केली. त्यावेळी मी शिकले की कोणालाही दोष देण्याची गरज नाही. जे झालं ते स्वीकारलं पाहिजे. माझ्या पालकांनी आम्हाला काहीही त्रास होऊ नये यासाठी खूप चांगले काम केले. ते जरी वेगळे झाले असले तरीही एक कुटुंबं म्हणून आम्ही अनेकदा एकत्र येतो”.

आणखी वाचा – प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांना त्या निर्णयाचा पश्चाताप, स्वतः खुलासा करत म्हणाल्या, “मी खूप स्वार्थी…”

आमिर व रिना १९८६ साली लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या १६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिरने किरण रावबरोबर लग्नगांठ बांधली. मात्र २०२१ साली तेही वेगळे झाले.     

Tags: aamir khandivorceira khan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
neena gupta as ganji chudail

हिरवा चेहरा, टक्कल, भयानक अवतार अन्…; नीना गुप्ता यांचा लूक पाहून सगळेच हैराण, ओळखणंही कठीण, म्हणाल्या, "चुडैल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.