बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. आजवर ती अनेक हिंदी तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते. तिच्या अनेक भूमिकांना चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. सध्या प्रियांका लॉस एंजलिसमध्ये कुटुंबाबरोबर स्थायिक झालेली बघायला मिळते. मुलगी व नवऱ्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील ती शेअर करताना दिसते. प्रियांकाने मॉडेलिंग करुन करियरची सुरुवात केली होती. २००० साली तिने मिस वर्ल्डचा किताबदेखील जिंकला आहे. खूप मेहनत करुन तिने मनोरंजन क्षेत्रात स्वतःची अशी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तिच्या प्रत्येक संघर्षाच्यावेळी तिची आई मधु चोप्रा यांनी तिची खूप साथ दिली. त्यांनी प्रियांकाबद्दल एका गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले आहे. (priyanka chopra mother statement)
मधु चोप्रा यांनी रॉड्रिगो कॅनल्सच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती दर्शवली होती. यावेळू त्यांनी प्रियांकाला बोर्डिंग स्कूलला पाठवण्याबद्दल भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “माहीत नाही पण मी एक स्वार्थी आई होते. मला आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. मी आजही ती गोष्ट आठवून रडते. माझ्यासाठीही खूप कठीण होते. पण मी प्रत्येक शनिवारी काम सोडून ट्रेन पकडायचे आणि प्रियांकाला भेटायला जायचे”.
पुढे त्या म्हणाल्या की, “तिच्यासाठीदेखील सगळं खूप कठीण होतं. ती बोर्डिंगमध्ये व्यवस्थित राहू शकत नव्हती. शनिवारी ती माझ्या येण्याची वाट बघायची आणि रविवारी आम्ही संपूर्ण दिवस एकत्रित राहायचो. संपूर्ण आठवडा तिच्या शिक्षिका मला भेटायला येण्यास रोखायच्या”.
मधु यांना प्रियांकाला बोर्डिंगला पाठवल्याचा आजही पश्चाताप होत असल्याचे सांगितले आहे. पण प्रियांकाने सगळे निर्णय योग्य घेतले आणि स्वतःच्या पायांवर उभी राहिली. मधू यांनी प्रियांकाच्या प्रत्येक निर्णयात साथ दिली. प्रियांकाबरोबर त्या नेहमी चित्रीकरणासाठीही जात असत. अभिनेत्रीने २००२ साली तमिळ चित्रपट ‘तमीजान’चित्रपटातून अभिनयास सुरुवात केली. सध्या ती निर्माती म्हणूनही नावारूपास आली आहे. तिने हिंदी तसेच मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.