Aishwarya Narkar Video : मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार आहेत ज्यांना बरेचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ही कलाकार मंडळी अनेकदा ट्रोलिंग कचाट्यात अडकतात. बहुतेकवेळा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला न जुमानता ती सडेतोड उत्तर देताना दिसतात. अशातच ट्रोलर्स वा चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर देण्यात एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या अनेकदा त्यांच्या रील व्हिडीओमुळे ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकल्या आहेत. मात्र वेळोवेळी त्यांनी या नेटकऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या नेहमीच सक्रिय असतात.
मराठी मालिकाविश्वातील ऐश्वर्या नारकर या एक लोकप्रिय चेहरा आहेत. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेत्रीने त्यांच्या अभिनय व सौंदर्याने ९० चं दशक गाजवलं. त्या काळातील त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या स्वतःचे आयब्रो स्वतः करताना दिसत आहेत. “फक्त एक्सट्रा केस”, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या धाग्याने आयब्रो करताना दिसतायत. हे पाहून चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांना अनेक सल्ले दिलेले पाहायला मिळत आहेत. एका चाहतीने कमेंट करत असं म्हटलं की, “मी पण काढते कधी कधी, पण याने डोळ्यावरची त्वचा लूज होते”, असं म्हटलं आहे.
तर एका चाहत्याने “एवढं कष्ट करण्यापेक्षा पार्लरमध्ये जा ना ताई”, असं म्हंटल आहे. यावर ऐश्वर्या यांनी उत्तर देत, “आपले आपण करुन बघण्यात गंमत आहे”, असं म्हटलं आहे. तर आणखी एका चाहतीने, “पण या ट्रिकमध्ये कधीकधी स्किनपण धाग्यामध्ये येते. हे थोडं धोकादायक आहे पण आयत्यावेळी ठीक आहे”, असं म्हटलं आहे. यावर ऐश्वर्या यांनी कमेंट करत, “हो. कधीतरी गंमत म्हणून आनंदीला”, असं म्हटलं आहे. सध्या ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे.