बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमी चर्चेत असलेल्या दिसून येतात. वयाच्या ६५ व्या वर्षीदेखील त्यांचा उत्साह हा तरुणाला लाजवेल असा असतो. सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे त्या न पटणाऱ्या गोष्टींवर बेधडक टीकादेखील करताना दिसतात. अनेकदा त्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेतही आल्या आहेत. अशातच आता इंटरनेटवर त्यांची पुन्हा एकदा जादू बघायला मिळत आहे. आता सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध असणाऱ्या गंजी चुडेलचा अवतार त्यांनी घेतला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहे. यामध्ये त्यांचा पूर्णपणे मेकओव्हर झालेला दिसून येत आहे. यामध्ये नक्की असे काय आहे? याबद्दल आता आपण जाणून घेऊया. (neena gupta as ganji chudail)
नीना यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पहायाल मिळत आहे. यामध्ये त्या प्रसिद्ध अशा गंजी चुडेल या अवतारात येताना दिसतात. यावेळी तिथे तीन युट्यूबर्सना बांधून ठेवलेल्या दिसत आहेत. नंतर त्या म्हणतात की, “मी आता या अवतारात थकले आहे. आता तुम्ही तिघी मला (बेब) तरुण बनवा”. तिघीनी नकार देताच नीना मस्करीमध्ये त्या तिघिंचे युट्यूब अकाऊंट बंद करण्याची धमकी देतात.
नंतर तिघीजणी गंजी चुडेलला जेन-झी चुडेल बनवण्यासाठी मदत करतात. नंतर नीना यांचा ग्लॅमरस लूक समोर येतो. हा व्हिडीओ शेअर करत त्या लिहितात की, “याला म्हणतात काहीही पुरावा मागे न ठेवणे #GenZChudail”. दरम्यान काही दिवसांपूर्वी नीना यांची मुलगी मसाबा गुप्ता आणि तिचे पती सत्यदीप मिश्रा यांनी काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. मसाबा व सत्यदीप हे दोघे त्यांच्या पहिल्या बाळाच्या प्रतीक्षेत होते. या जोडप्याने आई-बाबा झाले असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली होती.
मसाबा व सत्यदीप यांनी त्यांना मुलगी झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. आयुष्याच्या या नव्या टप्प्यात पाऊल ठेवताना त्यांनी आपल्या मुलीची पहिली झलकही दाखवली. नीना यांनी आजी झाल्याचा आनंद झाला असल्याचेही सांगितले होते. नातीबरोबरचे अनेक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.