बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सर्व भूमिकांना चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. सध्या ती अनेक कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणूनही दिसून आली आहे. त्याच प्रमाणे ती योगासने करतानादेखील दिसून येते. सोशल मीडियावरदेखील शिल्पा मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली दिसून येते.अनेक ट्रेंडिंग गाण्यांवरदेखील ती व्हिडीओ तयार करुन पोस्ट करत असते. अशातच आता शिल्पाचा नवीन व्हीडिओ समोर आला आहे. यामध्ये शिल्पा एका ट्रेंडिंग गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. (shilpa shetty on tambdi chamdi dance)
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या शिल्पाने ‘तांबडी चामडी’ या गाण्यावर डान्स करताना दिसली. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने “तांबडी चामडी आणि चेंबुर”, असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये शिल्पाने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच डान्स करताना ती विचित्र हावभाव करतानादेखील दिसत आहे. त्यामुळे आता शिल्पावर सर्व नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.
शिल्पाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ओव्हरॲक्टिग करत आहे की झपाटलं आहे?”, तसेच दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ही वेडी झाली आहे का?”, तसेच तिसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हा कोणत्या पद्धतीचा डान्स म्हणायचा?”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “असं वाटत आहे की हिला भुताने झपाटलं आहे”. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. शिल्पाने मात्र या सगळ्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
शिल्पाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, काही महिन्यांपूर्वी तिच्या सर्व संपत्तीवर जप्ती आल्याचे समोर आले होते. मात्र शिल्पा व राज कुंद्रा यांनी या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि जप्ती थांबवली गेली.