मुंबईमध्ये १२ ऑक्टोबर रोजी एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटणेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. शिल्पा शेट्टीपासून संजय दत्तपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु असलेले पाहायला मिळाले. या सगळ्यामुळे एक अभिनेता खूप कोलमडलेला पाहायला मिळाला. हा अभिनेता म्हणजे सलमान खान. बाबा सिद्दीकी यांचा अत्यंत जवळचा मित्र म्हणून सलमान खानचे नाव घेतले जाते. बाबा यांच्या हत्येनंतर सलमान पूर्ण वेळ त्यांच्या कुटुंबाबरोबर असलेला पाहायला मिळाला. आशातच आता बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकीने भाष्य केले आहे. (zeeshan siddiqui on salman khan)
दिवंगत बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशानने वाडिलांच्या मृत्यूनंतर सलमानबद्दल भाष्य केले आहे. सलमान नेहमी त्यांच्या कुटुंबाबाबरोबर असल्याचेदेखील त्याने सांगितले. पहिल्या दिवसापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सलमान सिद्दीकी कुटुंबाबरोबर असल्याचेही तो म्हणाला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये झीशानने याबद्दलचा खुलासा केला आहे. त्याने मुलाखतीमध्ये सांगितले की, “वाडिलांचया हत्येनंतर सलमान खूप चिंतेत होता. सलमान व बाबांचं नातं हे सख्या भावंडांसारखं होतं. सलमान आता रोज रात्री मला फोन करताना आणि झोप न येण्याबद्दल नेहमी चर्चा करतो”.
बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. यावेळी ते मुलगा झीशानबरोबर ऑफिसच्या बाहेर पडत होते. त्याचवेळी वेळेचा फायदा घेत त्यांना गोळ्या मारण्यात आल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेले पण त्यांचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला.
दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सलमानलादेखील बिश्नोइ गॅंगकडून इवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. अभिनेत्याच्या कुटुंबानेदेखील त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. सध्या सलमानला मुंबई पोलिसांनी Y+ सुरक्षा प्रदान केली आहे. काही दिवसांनापूर्वीच सलमान सुरक्षेमध्ये ‘बिग बॉस’च्या चित्रकरणास पोहोचला.