मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अडीच वर्षाच्या मुलीने म्हटला ‘अशी ही बनवाबनवी’चा डायलॉग, निवेदिता सराफांनी शेअर केला व्हिडीओ, डायलॉगची चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 28, 2024 | 4:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nivedita Saraf shared a video of a little girl saying ashi hi banwa banwi popular dialogue dhananjay mane ithech rahtat ka

निवेदिता सराफांनी लहान मुलीचा ‘धनंजय माने इथेच राहतात का’ म्हणतानाचा क्युट व्हिडीओ केला शेअर, नेटकऱ्यांकडून कौतुक

१९८८ मध्ये  प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. इतकी वर्षे होऊनही आजही हा चित्रपट पाहताना पुन्हा पुन्हा नव्याने पाहत असल्याचं वाटतं. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील सुवर्णपान ठरला. कित्येक वेळा चित्रपट पाहिला, त्यातील डायलॉग कितीही पाठ असेल, तरी आजही घराघरात हा चित्रपट त्याच आवडीने पाहिला जातो. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं निव्वळ मनोरंजन करणाऱ्या, आजही खळखळून हसवणाऱ्या या चित्रपटातील धनंजय माने इथेच राहतात का? हा डायलॉग तुफान गाजला. (dhananjay mane ithech rahtat ka little fan)

‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील कित्येक डायलॉग आजही चाहत्यांना तोंडपाठ आहेत, पण तरी हा चित्रपट प्रत्येकवेळी खळखळून हसवतो. चित्रपटातील ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या डायलॉगचा मोठा चाहतावर्ग आहे. अबालवृद्ध या चित्रपटावर आजही तितकेच प्रेम करतात आणि यातील प्रत्येक डायलॉग म्हणून दाखवतात. अशातच निवेदिता सराफ यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक अडीच वर्षांची चिमुकली मुलगी ‘अशी ही बनवाबनवी’मधील खास डायलॉग म्हणत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

आणखी वाचा – सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार मिळताच प्रसादसाठी अमृताची खास पोस्ट, म्हणाली, “‘पारु’ मालिकेमधला आदित्य बघताना…”

चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ज्याप्रकारे दरवाज्यावर हात मारत “धनंजय माने इथेच राहतात का?” हा संवाद म्हणून दाखवला होता. अगदी तसंच ही चिमकुली या व्हिडीओमध्ये करताना पाहायला मिळत आहे. निवेदिता सराफ यांनी चिमुकलीचा हा खास व्हिडीओ शेअर करत खाली कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “मृण्मयी नाडकर्णी वय वर्षे २.५. ‘अशी ही बनवाबनवी’ची आणि धनंजय माने यांची सगळ्यात छोटी चाहती” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, शांतिवनला भेट दिल्याचा खास व्हिडीओ केला शेअर, कौतुकास्पद काम पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, निवेदिता यांनी शेअर केलेला हा चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या लहान मुलीचे कौतुकही केलं आहे. निवेदिता या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या कामाबरोबरच काही फोटो व व्हिडीओही शेअर करत असतात. तसंच अनेक जुने किस्से, आठवणीही शेअर करत असतात. अशातच त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’च्या निमित्ताने एका लहान मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Tags: ashi hi banwa banwi dhananjay mane ithech rahtat ka dialoguedhananjay mane ithech rahtat ka little fannivedita saraf
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Bollywood actor Shah Rukh Khan dancing with his mother-in-law video of viral on social media

Video : शाहरुख खानचा सासूबाईंबरोबर स्टेजवरच भन्नाट डान्स, 'पठाण'च्या गाण्यावर थिरकले, उपस्थितही बघतच बसले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.