शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत शतग्रीवचा राक्षसाचा राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश, नवीन कथानक पाहून प्रेक्षक नाराज, म्हणाले, “काय बालिशपणा…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 18, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Shatagriva monster entry into the Rajadhyakshaha family new twist audience upset

Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत शतग्रीवचा राक्षसाचा राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश, नवीन ट्विस्टवर प्रेक्षक नाराज

Satvya Mulichi Satavi Mulgi : छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या कथानकातही काही दिवसांपूर्वी असांचं एक मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. यावेळी नेत्राच्या हातून देवी आईने दिलेल्या शस्त्रातून विरोचकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेत्राने विरोचकाचा वध केला आहे. त्यानंतर ती तिच्या जुळ्या मुलींना सोबत घेऊन पुढचं आयुष्य जगायला सुरुवात करते. नेत्राला जाणवू आणि दिसू लागतं की जुळ्या मुलींचे स्वभाव मात्र एकमेकींविरुद्ध आहेत. जिथे ईशा देवाशी निगडीत असलेल्या गोष्टींना स्वीकारते. पण रिमाला मात्र देवांच्या संदर्भातील एकही गोष्ट आवडत नाही. (Satvya Mulichi Satavi Mulgi serial update)

अशीच काहीशी गोष्ट कोलकातामधे घडते. जिथे एका उत्खननात शतग्रीव नामक असूराचा शिलालेख सापडतो. त्या शिलालेखाचं वाचन करताच एक शक्ती जागी होते आणि ती शक्ती पश्चिम बंगालच्या दिशेने प्रवास करताना दिसते. डॉ. मैथिली सेनगुप्ता म्हणून एका डॉक्टरच्या कानात ती किडारुपी शक्ती शिरते. मैथिली सेनगुप्ताचं वागणं बदलून जातं आणि एकाक्षणी मैथिलीमधे शिरलेली शक्ती रूप घेते आणि नवा राक्षस जागा होतो. एक साधी सरळ स्वभावाची मैथीली सेनगुप्ता शतग्रीव बनते आणि तिच्या सासूचा खून करत महाराष्ट्रच्या दिशेने निघते. याच कथानकाचा धागा धरत मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वाबद्दल बोलल्यावरुन रितेशकडून निक्कीची चांगलीच कानउघडणी, म्हणाला, “तुम्ही एक स्त्री असूनही…”

या नवीन प्रोमोमध्ये मैथिली सेनगुप्ता नामक शतग्रीव नेत्राच्या बाळाला घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये शतग्रीव राक्षस नेत्राच्या बाळाला घेऊन जात असतो. तेवढ्यात इंद्राणी, शेखरसह सर्वच जण तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण शतग्रीव सर्वांना हुसकावत पुढे जाते. इतक्यात नेत्रा येते आणि ती विरोचक असं ओरडते. त्यावर शतग्रीवही रागाने बघते.

आणखी वाचा – Video : पार्टी किंवा सेलिब्रेशन न करता गोरगरिबांना अन्नदान व भेटवस्तू देत क्रांती रेडकरने साजरा केला तिचा वाढदिवस, संस्कारांचं होतंय कौतुक

त्यामुळे मैथिली सेनगुप्ता आणि नेत्राच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय?, ती नेत्राच्या बाळाला घेऊन जाणार आहे का? शतग्रीवच्या येण्याने पुन्हा राजाध्यक्षांवर काही नवीन संकट येणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. दरम्यान, या नवीन कथानकावर मात्र प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. “काहीही दाखवतात”, “फालतू मालिका”, “काहीतरी सकारात्मकता दाखवा”, “काय बावळटपणा… देवापेक्षा मोठं कोणीही नाही. रक्ताने देवीला अभिषेक झाला, देवी बाळांना आशीर्वाद देते तरीही एक बाळ राक्षस. काय बालिशपणा…” अशा  अनेक कमेंट्स करत या प्रोमोला नापसंती दर्शवली आहे.  

Tags: marathi serialMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Omkar Raut on Kolkata Rape Case

Kolkata Rape Case प्रकरणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती, म्हणाला, "जसं राम मंदीर उभारण्यात आलं तसं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.