मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वाबद्दल बोलल्यावरुन रितेशकडून निक्कीची चांगलीच कानउघडणी, म्हणाला, “तुम्ही एक स्त्री असूनही…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 18, 2024 | 12:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update Riteish Deshmukh reacts to Nikki Tamboli statement about Varsha Usgaonkar motherhood

Bigg Boss Marathi 5 मध्ये वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वाबद्दल बोलल्यावरुन रितेशने निक्कीला सुनावले खडेबोल, नक्की काय म्हणाला?, जाणून घ्या...

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे. या कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी या शोचा खास भाऊचा धक्का पार पडला. या भाऊच्या धक्क्यावर रितेशने सर्वांची कानउघडणी करत सर्वांचाच समाचार घेतला. या घरात काही दिवस खेळाव्यतिरक्त स्पर्धकांनी वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य केली होती. गेल्या आठवड्यात बाहुल्यांचा टास्क संपल्यावर निक्कीने वर्षा यांच्या मातृत्त्वावर भाष्य केलं होतं. निक्कीच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली होती. वर्षा यांच्या चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी निक्कीच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशनेदेखील निक्कीला याबद्दल जाब विचारत तिला खडेबोल सुनावले. (Bigg Boss Marathi 5 daily update)

यावेळी रितेशने निक्कीला असं म्हटलं की, “तुम्ही या आठवड्यात वर्षा यांच्याबद्दल जे वक्तव्य केलंत. त्यासाठी कुठेही माफी नाही. तुम्ही त्यांना म्हणालात, ‘वर्षाजी तुम्हाला आईच्या भावना कशा कळणार?’ तुम्ही कोणाच्या तरी मातृत्त्वावर भाष्य केलं आहे आणि तुम्हीही एक स्त्री आहात. निक्की या भावना खरंतर तुम्हाला कळल्या पाहिजेत. आमच्या मराठी ‘बिग बॉस’मध्ये माफी मागायचं नाटक करायचं असेल, तर खुशाल करा. अख्खा महाराष्ट्र बघत आहे. पहिल्या आठवड्यात तुम्ही सॉरी म्हणालात, दुसऱ्या आठवड्यात सॉरी म्हणालात आणि आताही तेच केलंत. तुम्ही एका शोमध्ये आहात आणि इथे शंभर कॅमेरे आहेत, तुमचा प्रत्येक शब्द कॅप्चर केला जातो. तुम्ही जे बोलता ते आज घराघरांत लोक पाहत आहे त्यामुळे जबाबदारीने बोलणं तुम्हाला भाग आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या या एका वाक्याने फक्त या एका व्यक्तीचं मन दुखवलं गेलं आहे”.  

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “कारण तो संस्कारी मुलगा आहे”, ‘या’ कारणामुळे रितेश देशमुखनं केलं सूरज चव्हाणचं कौतुक, म्हणाला…

यापुढे त्याने असं म्हटलं की, “तुमचा एक स्वतंत्र बिग बॉस सुरू आहे तो म्हणजे ‘निक्कीचा बिग बॉस’. तुमच्या ‘बिग बॉस’मध्ये तुम्ही कोणत्याही थराला जाता, समोरच्या माणसाचा वाटेल तसा अपमान करता आणि हे सगळं करून नंतर सॉरी बोलता. पण, आमच्या ‘बिग बॉस मराठी’मध्ये सॉरी बोलावं लागेल असं कोणी वागायचंच नसतं. हे असं वागणं तुम्हाला काही जमणार नाही. “दररोज चुका करून इतक्या वेळा सॉरी बोलू नका की, एक दिवस प्रेक्षक तुम्हालाच सॉरी म्हणतील आणि ‘बिग बॉस मराठी’मधून तुम्हाला बाहेर करतील”.

आणखी वाचा – Video : पार्टी किंवा सेलिब्रेशन न करता गोरगरिबांना अन्नदान व भेटवस्तू देत क्रांती रेडकरने साजरा केला तिचा वाढदिवस, संस्कारांचं होतंय कौतुक

यापुढे रितेशने वर्षा उसगांवकरांना उद्देशून म्हटलं की, “वर्षाजी तुम्ही हा विषय वाढवू शकला असता, याच्यावर वाद घालू शकला असता. पण, असं न करता हा विषय तुम्ही अतिशय संयमाने हाताळला. एकही शब्द बोलला नाहीत आणि माफी मागितल्यावर तुम्ही पटकन माफही केलंत. यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक आहे”. दरम्यान, यापुढे रितेशने “वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी न करता हा गेम खेळा, इथे काय सुरु आहे? याबद्दल संवाद साधा. कोणाच्याही कुटुंबियांबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करू नका” अशी ताकीद दिली.  

Tags: bigg boss marathi 5nikki tamboliriteish deshmukhvarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Shatagriva monster entry into the Rajadhyakshaha family new twist audience upset

Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत शतग्रीवचा राक्षसाचा राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश, नवीन कथानक पाहून प्रेक्षक नाराज, म्हणाले, “काय बालिशपणा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.