सोशल मीडिया हे माध्यम सध्या सगळ्यांसाठीच जवळच आहे असं म्हणायला हरकत नाही. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यत प्रत्येक जण सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करून अपडेट देत असतो. यात ट्रेंडिंग रील्सला अधिक प्राधान्य असलेलं पाहायला मिळतंय. सध्या कलाकार ट्रेंडींगनुसार रील्स करताना दिसतात. आणि प्रेक्षकही कलाकारांच्या या रील्सला भरभरून प्रतिसाद देताना दिसतायत. (Saie Tamhankar Sanjay Jadhav)
अशातच लोकप्रिय आणि ट्रेंडिंग अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या सोशल मीडियावरून पोस्ट केलेला रील सध्या व्हायरल होताना दिसतोय. सई सोबत या रील व्हिडिओमध्ये दिग्दर्शक संजय जाधव ही पाहायला मिळतोय. या रिलमध्ये संजय जाधव सईला सोशल मीडियाचं महत्व पटवून देताना दिसतोय.
का सल्ला दिलाय संजय जाधवांनी सईला (Saie Tamhankar Sanjay Jadhav)
संजय जाधव सईला सोशल मीडियाचं महत्त्व पटवून देताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये सई संजय जाधव यांना विचारतेय सोशल मीडियावर तू आजकाल बरेच रील्स बनवतो आहेस. यावर संजय जाधव हो म्हणत सईला सल्ला देताना दिसतायत की, हो अग, या रील्स मुळे बराच सिनेविश्वात काम करताना फरक पडलाय. तू सुद्धा रील्स करत जा, यापुढे ते सईला सांगतायत की मी रील्स बनवलेत म्हणून माझे फॉलोवर्स ही वाढलेत, 680 k फॉलोवर्स आहेत माझे हे ऐकून सई शांत होते, आणि मोबाईल वर संजय जाधव याना इंस्टाग्राम अकाउंट दाखवत सांगतेय की, माझे 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत, हे ऐकून संजय जाधव यांची बोलतीच बंद झालेली पाहायला मिळते.(Saie Tamhankar Sanjay Jadhav)
हे देखील वाचा – ‘क्या ये नाइंसाफी हैं?’, म्हणत उर्मिला नेमकं कोणावर संतापलीय
संजय जाधवने सईला दिलेल्या सल्ल्यावर सईच्या उत्तराने संजय जाधवची बोलतीच बंद केलेली या व्हिडिओत पाहायला मिळाली. तर सई आणि संजय यांच्या या गमतीशीर व्हिडिओवर प्रेक्षकांनाही हसू आवरलेलं नाही. सई अधूनमधून असे गमतीशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. शिवाय ती विशेष चर्चेत असते ती तिच्या फोटोशूटमुळे.
