सिनेसृष्टीत आपल्याला पडद्यावर कलाकारांना पाहायला आवडत. मात्र हे कलाकार कोणत्या अडचणीत शूट करून स्क्रीनवर अभिनय सादर करताना दिसतायत याचा आपण कधीच विचारही करत नाही. उलट त्यांचं काही चुकलं तर आपण त्यांनाच बोल लगावतो, ट्रोल करतो, मात्र हे कलाकार पडद्यावर येण्याआधी कोणत्या कठीण परिस्थितीला समोर जातात हे आपण कधीच पाहत नाही. याबाबतची एक खास व्हिडीओ लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने शेअर केली आहे.(Urmila Kothare New Video)
अभिनेत्री उर्मिला कोठारेने आजवर तिच्या नृत्यकलेने आणि अभिनय कौशल्याने प्रत्येकाच्या मनात घर केलंच आहे. उर्मिलाने तुझेच मी गीत आहे या मालिकेतून बऱ्याच वर्षांनी मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत उर्मिला मंजुळा सातारकर ही भूमिका साकारताना दिसतेय. उर्मिला सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ फोटो ती नेहमीच शेअर करत असते.
पहा उर्मिला कोणावर संतापलीय (Urmila Kothare New Video)
अशातच उर्मिलाच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडिओमध्ये उर्मिला तुझेच मी गीत आहे मालिकेतील सीन शूट करण्यात व्यस्त आहे. क्या ये नाइंसाफी हैं या नही..comment में बताइये असं कॅप्शन देत तळपत्या उन्हात शूट करतानाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यांत ऊर्मिलाने नाइंसाफी हैं असं म्हणत गरमीत सीन शूट करतानाच व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओमध्ये ती फॅनसमोर बसून शूट करणाऱ्या दिग्दर्शकाला दाखवतेय आणि म्हणतेय की आम्ही उन्हात शूट करतोय आणि हे आमचे दिग्दर्शक पहा.(Urmila Kothare New Video)
हे देखील वाचा – शिवानी आणि विराजसच्या लग्नाला एक वर्ष पूण होताच केली खास पोस्ट
तर उर्मिलाचा हा व्हिडीओ पाहून तिच्या सोबत खरंच नाइंसाफी झाली आहे का असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे. उर्मिला अनेक रील्स बनवून ती इंस्टाग्रामवरून नेहमीच पोस्ट करत असते, उर्मिलाचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. ती तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असेल. उर्मिलाने शेअर केलेल्या रील्स या गमतीशीर असतात, आणि प्रेक्षकांना पाहायलाही त्या आवडतात.