‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अरुंधती देशमुखांच्या घरातून बाहेर पडताना दिसणार आहे. संजनाला अरुंधती देशमुखांच्या घरी राहिलेली नको असते, त्यामुळे ती नेहमीच तिला ऐकवते. तर अरुंधतीही आरोही व यशच लग्न होईपर्यंत ती इथे राहील आणि नंतर निघून जाईल असं म्हणते. त्यानुसार अरुंधती आता देशमुखांचे घर सोडणार आहे. अरुंधतीने देशमुखांच्या घरासमोरच नवं घर घेतलं आहे. ती गोष्टही संजनाला खटकलेली असते. अरुंधती आता आपल्या घरासमोर राहून आपल्यावर, या घरावर लक्ष ठेवणार म्हणून संजनाला असुरक्षित वाटत असतं. (Aai Kuthe Kay Karte Promo)
यावरुन संजना अरुंधतीला सुनावते. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये संजना म्हणते की, “तुम्ही दोघी अरुंधतीच कौतुक करत आहात. तुम्हाला माहिती नाही ही किती आगाऊ आहे. तिला या घरावरचं वर्चस्व सोडायचं नाही आहे. म्हणजे घर सोडून जाण्याचं नाटक करणार आणि घरासमोर राहून या घरावर सतत लक्ष ठेवणार आणि या घरावर वर्चस्व करणार. आणि तुम्हाला तिचं कौतुक वाटतं आहे. कमाल आहे. तिचं सगळं लक्ष सतत आपल्याच घरावर राहणार.
यावर अरुंधती बोलते, “तुझं जर या घरावर लक्ष असतं, तर मला काळजी वाटली नसती. आणि मग या घरात लक्ष घालायची गरजच वाटली नसती”. यावर संजना पुन्हा बोलते, “बघा. हिने माझं म्हणणं सिद्ध केलं आहे. आणि स्वीकारलं आहे. इतके दिवस हिने माझ्या संसारात लक्ष घालून मला त्रास दिला आहे. आणि आता ती पुन्हा इथे ढवळाढवळ करत आहे. अनघा, आरोही वेळीच सावध राहा. मी हे माझ्या अनुभवावरुन बोलत आहे. अरुंधती तुला आमच्या घरात लक्ष द्यायची गरज नाही. तू तुझ्या आयुष्यावर फोकस कर”. यावर अरुंधती संजनाला बोलते, “तुझ्यासारखी मी स्वार्थी नाही. माझ्या आयुष्याचं काय करायचं हे मी बघेल. तुला चांगली सून व्हायची असेल तर घराकडे लक्ष दे आणि निदान मोठ्यांचा मान राखायला शिक”.
यावर संजना अरुंधतीला बोलते, “तुझी बडबड मला ऐकायची नाही. हिंमत असेल तर हे घर सोडवत नाही हे मान्य कर”. यावर अरुंधती, “मला हे घर सोडवणार नाहीच. कारण माझ्या आयुष्याची २६ वर्ष या घरात गेली आहेत. तुला का असुरक्षित वाटतंय. तुझं आयुष्य कसं स्थिर करता येईल हे बघ”, असं बोलून निघून जाते.