मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’कडे प्रेक्षकांची पाठ, तर ‘ठरलं तर मग’च टीआरपीमध्ये पुढे, ‘पारू’ मालिकेचा टीआरपी नक्की किती?, संपूर्ण यादी समोर

Saurabh Moreby Saurabh More
मे 17, 2024 | 4:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Paru Tharla Tar Mag Star Pravah Zee Marathi serial TRP

'आई कुठे...'कडे प्रेक्षकांची पाठ, तर 'ठरलं तर मग'च टीआरपीमध्ये पुढे, 'पारू' मालिकेचा टीआरपी नक्की किती?, संपूर्ण यादी समोर

छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे अनेकांच्या आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या मालिकेतील घटना, प्रसंगे, पात्र, कथा किंवा संवाद यांसारखे अनेक घटक सामान्य प्रेक्षक स्वत:बरोबर रीलेट करतात. त्यामुळे प्रत्येक घराघरांत या मालिका खूप आवडीने पाहिल्या जातात आणि प्रेक्षकांच्या बघण्यामुळे या मालिकांना लोकप्रियता मिळते. ही लोकप्रियता कायम टिकवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार त्याचबरोबर तंत्रज्ञदेखील मेहनत घेतात. या लोकप्रियतेवरच मालिकेचा टीआरपी अवलंबून असतो. अशातच नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांच्या टीआरपी समोर आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जुई गडकरी व अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेले ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. यासह स्टार प्रवाहच्या इतर मालिकाही टीआरपीच्या शर्यतीत पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे गेल्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट शेअर करण्यात आला असून यामध्ये ठरलं तर मग’ ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेला ६.९ रेटिंग मिळाली आहे. तर या मालिकेखाली अनुक्रमे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘तुझेच गीत गात आहे’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘साधी माणसं’ आदी मालिका आहेत.

View this post on Instagram

A post shared by #TRPTADKA (@marathitrptadka)

आणखी वाचा – Video : …अन् ‘ती’ बातमी कळताच कार्तिकी गाडकवाडची सासू आनंदाने उड्या मारु लागली, आई झाल्यानंतर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

या मालिकांच्या खालोखाल ‘झी मराठी’च्या नव्या मालिका ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांनी जुन्या मालिकांना मागे टाकल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पारू’ मालिका टीआरपीच्या यादीत १५ व्या स्थानावर असून २.७ रेटिंग मिळाले आहेत. तसेच अभिनेत्री पूर्वा फडके व अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिका असलेली ‘शिवा’ मालिका १९ व्या स्थानावर आहे. या मालिकेला २.४ रेटिंग मिळाले आहे.

आणखी वाचा – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, अमेरिकेला जाणार होते पण…

तर याच मालिकांनंतर झी मराठीची ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका २० व्या स्थानावर असून या मालिकेला २.४ रेटिंग मिळाले आहे. त्यानंतर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिका आहेत. दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा टीआरपी घसरला असून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा टीआरपी स्थिर आहे.

Tags: marathi entertainment newsmarathi serialMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Konkan Railway is going to recruit for various posts know more about this see the details

कोकण रेल्वेमध्ये मोठी भरती, शैक्षणिक पात्रत किती?, कधीपर्यंत अर्ज भरता येणार?, ५६.१०० पर्यंत वेतन मिळणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.