गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरुंधतीने घर सोडून जाण्यासाठी संजनाचा आरडाओरडा, नको नको ते सुनावलं, आता काय निर्णय घेणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 17, 2024 | 5:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Promo

अरुंधतीने घर सोडून जाण्यासाठी संजनाचा आरडाओरडा, नको नको ते सुनावलं, आता काय निर्णय घेणार?

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अरुंधती देशमुखांच्या घरातून बाहेर पडताना दिसणार आहे. संजनाला अरुंधती देशमुखांच्या घरी राहिलेली नको असते, त्यामुळे ती नेहमीच तिला ऐकवते. तर अरुंधतीही आरोही व यशच लग्न होईपर्यंत ती इथे राहील आणि नंतर निघून जाईल असं म्हणते. त्यानुसार अरुंधती आता देशमुखांचे घर सोडणार आहे. अरुंधतीने देशमुखांच्या घरासमोरच नवं घर घेतलं आहे. ती गोष्टही संजनाला खटकलेली असते. अरुंधती आता आपल्या घरासमोर राहून आपल्यावर, या घरावर लक्ष ठेवणार म्हणून संजनाला असुरक्षित वाटत असतं. (Aai Kuthe Kay Karte Promo)

यावरुन संजना अरुंधतीला सुनावते. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये संजना म्हणते की, “तुम्ही दोघी अरुंधतीच कौतुक करत आहात. तुम्हाला माहिती नाही ही किती आगाऊ आहे. तिला या घरावरचं वर्चस्व सोडायचं नाही आहे. म्हणजे घर सोडून जाण्याचं नाटक करणार आणि घरासमोर राहून या घरावर सतत लक्ष ठेवणार आणि या घरावर वर्चस्व करणार. आणि तुम्हाला तिचं कौतुक वाटतं आहे. कमाल आहे. तिचं सगळं लक्ष सतत आपल्याच घरावर राहणार.

आणखी वाचा – “प्रियांका चोप्रा व मला…”, घटस्फोटानंतर प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचं सासरच्या मंडळींबाबत भाष्य, म्हणाली, “बँड चालवणारेच…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

यावर अरुंधती बोलते, “तुझं जर या घरावर लक्ष असतं, तर मला काळजी वाटली नसती. आणि मग या घरात लक्ष घालायची गरजच वाटली नसती”. यावर संजना पुन्हा बोलते, “बघा. हिने माझं म्हणणं सिद्ध केलं आहे. आणि स्वीकारलं आहे. इतके दिवस हिने माझ्या संसारात लक्ष घालून मला त्रास दिला आहे. आणि आता ती पुन्हा इथे ढवळाढवळ करत आहे. अनघा, आरोही वेळीच सावध राहा. मी हे माझ्या अनुभवावरुन बोलत आहे. अरुंधती तुला आमच्या घरात लक्ष द्यायची गरज नाही. तू तुझ्या आयुष्यावर फोकस कर”. यावर अरुंधती संजनाला बोलते, “तुझ्यासारखी मी स्वार्थी नाही. माझ्या आयुष्याचं काय करायचं हे मी बघेल. तुला चांगली सून व्हायची असेल तर घराकडे लक्ष दे आणि निदान मोठ्यांचा मान राखायला शिक”.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’कडे प्रेक्षकांची पाठ, तर ‘ठरलं तर मग’च टीआरपीमध्ये पुढे, ‘पारू’ मालिकेचा टीआरपी नक्की किती?, संपूर्ण यादी समोर

यावर संजना अरुंधतीला बोलते, “तुझी बडबड मला ऐकायची नाही. हिंमत असेल तर हे घर सोडवत नाही हे मान्य कर”. यावर अरुंधती, “मला हे घर सोडवणार नाहीच. कारण माझ्या आयुष्याची २६ वर्ष या घरात गेली आहेत. तुला का असुरक्षित वाटतंय. तुझं आयुष्य कसं स्थिर करता येईल हे बघ”, असं बोलून निघून जाते.

Tags: aai kuthe kay karteAai kuthe kay karte promomarathi malikamarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
"आई-बहिणीबरोबर फिरायला जाते मग नवऱ्याबरोबर का नाही?", प्रश्न विचारणाऱ्याला अमृता खानविलकरचं उत्तर, म्हणाली, "काही गोष्टी..."

"आई-बहिणीबरोबर फिरायला जाते मग नवऱ्याबरोबर का नाही?", प्रश्न विचारणाऱ्याला अमृता खानविलकरचं उत्तर, म्हणाली, "काही गोष्टी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.