रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई-बहिणीबरोबर फिरायला जाते मग नवऱ्याबरोबर का नाही?”, प्रश्न विचारणाऱ्याला अमृता खानविलकरचं उत्तर, म्हणाली, “काही गोष्टी…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 17, 2024 | 5:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
"आई-बहिणीबरोबर फिरायला जाते मग नवऱ्याबरोबर का नाही?", प्रश्न विचारणाऱ्याला अमृता खानविलकरचं उत्तर, म्हणाली, "काही गोष्टी..."

"आई-बहिणीबरोबर फिरायला जाते मग नवऱ्याबरोबर का नाही?", प्रश्न विचारणाऱ्याला अमृता खानविलकरचं उत्तर, म्हणाली, "काही गोष्टी..."

आपल्या अभिनयाने व नृत्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी अमृता खानविलकर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. अमृता सध्या तिच्या आई-वडिलांसह लंडनमध्ये गेली असून लंडनमध्ये ती तिच्या आई-वडिलांसह सुट्ट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटत आहे. या लंडन ट्रीपचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोद्वारे अमृताच्या लंडनवारीचे काही खास क्षण पाहायला मिळत आहे. 

अमृता लंडनमध्ये पोहोचल्यापासून लंडनमधील अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टद्वारे तिने “एका विशिष्ट वयानंतर आपल्या पालकांबरोबर फिरणे म्हणजे लहान मुलांबरोबर प्रवास करण्यासारखे आहे.” असं म्हटलं होतं. तसेच यापुढे तिने “या प्रवासात तुम्हाला एका गोष्टीला सर्वात आधी प्राधान्य दिले पाहिजे ते म्हणजे त्यांचे खाणंपिणं आणि मग त्यांच्याभोवती फिरण्याची ऊर्जा”. असं म्हटलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

आणखी वाचा – ‘आई कुठे…’कडे प्रेक्षकांची पाठ, तर ‘ठरलं तर मग’च टीआरपीमध्ये पुढे, ‘पारू’ मालिकेचा टीआरपी नक्की किती?, संपूर्ण यादी समोर

अमृताच्या या पोस्टवर कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच या पोस्टखाली अमृताच्या एका चाहतीने तिला तिच्या नवऱ्याबद्दलचा प्रश्न विचारला आहे. चाहतीने “तू हिमांशू म्हणजेच नवऱ्याबरोबर कधीच प्रवास का करत नाहीस? तू नेहमीच तुझ्या आई किंवा बहिणीबरोबर फिरायला जात असते. पण तू व हिमांशु तुम्ही क्वचितच कुठेतरी एकत्र फिरायला जाता” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, अमेरिकेला जाणार होते पण…

यावर अमृताने उत्तर देत असं म्हटलं आहे की, “हिमांशू हा इन्स्टाग्रामवर नाही. त्याचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे, पण तो कोणाला फॉलो करत नाही. तो इन्स्टाग्रामवर जास्त पोस्ट वगैरे करत नाही. त्यामुळे फोटो टाकण्यात काही अर्थ नाही. शिवाय काही गोष्टी आहेत, ज्या आम्हाला पूर्णपणे खासगी ठेवायला आवडतात.”

दरम्यान, अमृताच्या या उत्तरावर त्या चाहतीने पुन्हा तिला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “कृपया कधीतरी पोस्ट करा. कारण मी तुम्हा दोघांची खूप मोठी चाहती आहे. ‘नच बलिये’पासून मला तुमची जोडी आवडते. मला तुम्हा दोघांची खूप आठवण येते. त्यामुळे कृपया कधीतरी एकत्र काहीतरी पोस्ट करा”.

Tags: amruta khanvilkarmarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
katrina kaif Pregnancy Rumours

कतरिना कैफ गरोदर?, शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, फोटो शेअर करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.