‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमानंतर पोस्ट ऑफिस उघड आहे या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर चांगलाच कल्ला केला. गेल्या गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेनंतर पोस्ट ऑफिस उघड आहे या मालिकेवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. कारण या मालिकेत समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, पृथ्वीक प्रताप, सचिन गोस्वामी या हास्यजत्रेतील कलाकारांचा दंगा पाहायला मिळाला. आता मात्र पोस्ट ऑफिस उघड आहे मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मालिकेने आता राम राम ठोकला आहे.(post office ughad ahe wrap up)
पृथ्वीक प्रताप याने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून असे कळतेय की, नुकतीच पोस्ट ऑफिस उघड आहे मालिकेच्या साऱ्या कलाकारांची wrapup पार्टी झाली. wrapup पार्टीचे फोटो त्यांनी शेअर करत याबाबत माहिती दिली. तर वनिता खरात हिने ही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट केलीय. इशा डे हिने तर wrapup पार्टी नंतरची पार्टी एकत्र बसून गाणी गाऊन साजरा करतानाचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. wrapup पार्टीचे फोटो जरी त्यांनी पोस्ट केले असले तरी ही सगळी मंडळी आपल्याला महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत कल्ला करताना दिसणार आहेत.
पहा कलाकारांची wrapup party दरम्यानची मजामस्ती (post office ughad ahe wrap up)

छोट्या पडद्यावर एक वेगळ्या धाटणीची ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या लेखक-दिग्दर्शक जोडीची ही नवी मालिका होती. दरम्यान या मालिकेत मकरंद अनासपुरे यांना पाहणंही रंजक ठरलं. पोस्ट ऑफिस या मालिकेची निर्मिती सचिन गोस्वामींनी केली असून त्यांच्या “वेट क्लाउड प्रोडक्शन” मध्ये या मालिकेची निर्मिती करण्यात आली. (post office ughad ahe wrap up)
हे देखील वाचा – ‘भारावलेल्या डोळ्यांनी त्यांनी…’ असे म्हणत सिद्धार्थ जाधवची भावुक पोस्ट
कालच सचिन गोस्वामींनी “सगळं कसं ठरल्या(ठरवल्या) प्रमाणे घडतंय” अशी चार शब्दांची पोस्ट शेअर केली असता, त्यावर त्याच्या चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रियेमुळे सचिन यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. “पोस्ट ऑफिस उघडं आहे” ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या संदर्भातली ही पोस्ट असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं आहे.
