असा नट होणे नाही असे म्हणणाऱ्या सिनेअभिनेते अशोक सराफांच्या व्हिडिओचं करावं तेवढं कौतुक कमीच. झी चित्र गौरव कार्यक्रमात यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. दरम्यानचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. अभिनेता सिद्धार्थ जाधव ने यावेळी त्यांना जुन्या गाण्यांवर ठेका धरत अशोक मामांना मानवंदना दिली, आणि हे सारं डोळे दिपवणार होत. यंदाच्या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे मानकरी दिग्गज सिनेअभिनेते आणि आपल्या सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ हे ठरले. (siddharth jadhav emotional post)
अर्थात एक काळ आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या या अभिनेत्याबद्दल बोलावं तितकं कमीच. त्यांच्यातील कलागुणांनी त्यांचा हा प्रवास इथपर्यंत आणायला सज्ज केलाय. अशा या बहुरूपी कळकरची व्यक्तिरेखा साकारत सिद्धार्थ जाधवने मंचावर आपली कला दाखवली. सर्व स्तरातून सिद्धार्थच झालेलं कौतुक हे वाखाणण्याजोगं होत. अशातच सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोने आणि त्याखालील कॅप्शनने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळविल्या आहेत.
पहा सिद्धार्थची भावुक पोस्ट (siddharth jadhav emotional post)

इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. यांत अशोक सराफ यांच्या पायाशी बसून काढलेला फोटो त्याने पोस्ट केला आहे. आणि त्याखाली लिहिलंय की, ‘अशोक सराफ… अशोक मामा… माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य आणि त्यांची मूर्ती मनात बसवून काम करू पाहणारे आम्ही एकलव्य…. त्याच्या पायाशी कधी बसायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. (siddharth jadhav emotional post)
पण आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली … आणि अशोक मामांना ती मनापासून आवडली.. भारावल्या डोळ्यांनी त्यांनी कौतुक केलं.. आशिर्वाद दिले… मामांना जीवन गौरव मिळाला हे आहेच पण त्यांच्यासमोर असा परफॉर्मन्स करून माझ्या जीवनाचं सार्थक झालं….हा क्षण आयुष्यभर माझ्या लक्षांत राहील ….मनापासून आभार @zeemarathiofficial असे त्याने लिहिले आहे.
हे देखील वाचा – अनिरुद्धला मिळालं अरुंधतीसोबत वाद घालण्यासाठी नवं कारण
त्याच्या या पोस्टवर कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. फोटोला सावनी रवींद्रने पोस्ट करत लिहिलंय, You were magical siddhu❤️???? stay blessed ???? तर एका युजरने लिहिलंय, खरंच हे भाग्य आहे तुझं सिध्दू दादा,आम्ही हि मामा चे चित्रपट पाहून मोठे झालो.????❤️ चाहत्यांच्या सिद्धूसाठीच्या या पोस्ट हृदयस्पर्शी आहेत.
