शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधील जेनिफर मिस्त्रीने असित मोदी यांच्यावर केलेले लैंगिक शोषणाचे ओराप, अभिनेत्रीच्या बाजूने निकाल, निर्मात्यांना दंड भरावा लागणार

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 26, 2024 | 6:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jennifer mistri on asit kumar modi

'तारक मेहता...'मधील जेनिफर मिस्त्रीने असित मोदी यांच्यावर केलेले लैंगिक शोषणाचे ओराप, अभिनेत्रीच्या बाजूने निकाल, निर्मात्यांना दंड भरावा लागणार

  लहान पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. मालिकेतील दया ही भूमिका साकरणारी दिशा वकानी बाहेर पडल्यानंतर या मालिकेकडे प्रेक्षकांनी बऱ्यापैकी पाठ फिरवली होती. त्यामुळे ती परत मालिकेत येऊ शकते असे मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलेही होते मात्र अद्याप तसे झाले नाही. अशातच काही महिन्यांपूर्वी या मालिकेतील ‘मिसेस सोढी’ची भूमिका करणारी जेनिफर मिस्त्री बंसीवाल यांनी शारीरिक शोषण झाल्याबद्दलची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल आता समोर आला आहे. (jennifer mistri on asit kumar modi)

जेनिफर यांनी काही महिन्यांपूर्वी मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या मदतीने या प्रकरणाची कार्यवाही सुरु झाली होती. पण निकाल जेनिफर यांच्या बाजूने लागला तरीही असित यांना शिक्षा मिळाली नव्हती. या प्रकरणामध्ये असित यांच्याबरोबरच सोहेल रमानी व जतिन रमानी यांच्या विरोधातही शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. पण आता हा निकाल आला असून असित यांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदावरुन हार्दिक पांड्या ट्रोल, रोहित शर्मावरुन डिवचणाऱ्यांना पोलार्डचं उत्तर, म्हणाला, “आम्ही जे काही करतो ते…”

View this post on Instagram

A post shared by Jennifer Mistry Bansiwal????‍♀️♾ (@jennifer_mistry_bansiwal)

या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्याने अभिनेत्रीने महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली होती. स्थानिक तक्रार समितीच्या गठनानंतर या प्रकरणाची कार्यवाही होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर असित यांना कामाच्या ठिकाणी माहिलांवर लैंगिक शोषण कायदा २०१३ अंतर्गत चार महिन्यात दोषी म्हणून घोषित झाले. या प्रकरणात जेनिफरने एका माध्यमाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, “हो , निकाल माझ्या बाजूने लागला आहे. मी जे आरोप केले आहेत त्याबद्दल माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मी निर्माते असित मोदी, ऑपरेशन हेड सोहिल रमाणी व एग्ज्यूक्युटीव्ह निर्माते जतिन बजाज यांच्या विरोधात शारीरिक शोषणाचे आरोप केला होता. पण मुंबई पोलिसांकडे विचारल्यानंतरही कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मी स्थानिक तक्रार समितिची मदत घेतली आणि निकाल लवकर लागला”.

आणखी वाचा – ‘रामायण’मधील राम म्हणजेच अरुण गोविल यांची वर्षभराची नेमकी कमाई किती?, भाजपामधून लोकसभा निवडणूकही लढवणार

पुढे त्या म्हणाल्या की, “मला हे सांगताना खूप दु:ख होते की पोलिस अधिकाऱ्यांनी गेल्या एका वर्षात काही करु शकले नाहीत. मी दिलेले सर्व पुरावे लक्षात घेऊन निकल माझ्या बाजुने लागला. असितना पांच लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. बाकी रक्कम त्यांनी दिली नव्हती. ही एकूण रक्कम २० ते २५ लाख इतकी आहे. शारीरिक शोषणाच्या आरोपासाठी त्यांना पाच लाख रुपयांचा अतिरिक्त दंड द्यावा लागला. हा निकाल १५ फेब्रुवारी २०२४ रोजी लागला. पण यावर काहीही भाष्य करण्यास बंदी घातली होती”.

दरम्यान या प्रकरणाची मनोरंजन क्षेत्रांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

Tags: asit kumar modiJennifer mistrytaarak Mehta ka oolta chashmaTelevision
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Lesbian couple Anjali chakra and sufi malik breakup Pakistani influencer got troll

"मीच तिची फसवणूक केली", भारत-पाकिस्तानी लेस्बियन जोडप्याचं ब्रेकअप, लग्नही ठरलेलं, पाकिस्तानी सुफीचीच कबुली, काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.