‘रामायण’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे अरुण गोविल. रामायण मालिका संपल्यानंतर गेले काही दिवस अरुण गोविल हे नाव चांगलेच चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या राम मंदीरच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला अरुण गोविल यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अशातच त्यांना नुकतीच त्यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे अभिनेते म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर अरुण गोविल आता स्वत:ला नेते म्हणून सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
अरुण गोविल यांनी केवळ टीव्ही मालिकांमध्येच नाही तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. नव्यानेच राजकारणात आलेल्या अरुण गोविल यांच्याकडे किती मालमत्ता आहे, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे, चला तर जाणून घेऊयात अरुण गोविल यांची एकूण संपत्ती किती आहे याबद्दल.
‘रामायण’ या धार्मिक मालिकेतून लोकप्रिय झाल्यानंतर अरुण गोविल यांनी त्यांच्या मानधनात तब्बल २५ टक्के वाढ केली होती. रिपोर्ट्सनुसार, अरुण गोविल यांनी ‘OMG 2’ चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन घेतले होते. तरीही त्यात त्यांची भूमिका छोटीच होती. अशातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटासाठी अरुण गोविल यांनी ८० लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात आले.
आणखी वाचा – Video : चष्मामधून रवीना टंडन उडवत होती पाणी, अभिनेत्रीची भलतीच पिचकारी, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
काही अहवालांवर विश्वास ठेवला तर अरुण गोविल हे दरवर्षी १० ते १२ लाख रुपये कमावतात. अभिनय आणि जाहिराती हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. अरुण गोविल यांचे मुंबईत स्वतःचे घर असून नुकतीच त्यांनी एक आलिशान कारही खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुण गोविल यांच्याकडे सध्या ३८ ते ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
दरम्यान, एका टॉक शोमध्ये अरुण गोविल यांनी सांगितले होते की, त्यांना असे काहीतरी करायचे आहे जेणेकरुन लोक त्यांना कायम लक्षात ठेवतील आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळेल. त्याप्रमाणे अरुण गोविल यांना ‘रामायण’ मालिकेद्वारे अमाप लोकप्रियता मिळाली असून आता राजकरणाद्वारे ते लोकांच्या अधिक काळ स्मरणात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.