सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली चक्राने व सुफी मलिक एकममेकांपासून विभक्त झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे. २०१९ मध्ये या दोघांनी आपलं लेस्बियन रिलेशनशिप जाहीर केलं होतं आणि तेव्हापासून दोघं सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. सुफी आणि अंजली हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्याच वर्षी दोघींनी साखरपुडासुद्धा केला होता., मात्र आता ते एकमेकांपासून विभक्त झाले असल्याची माहिती मिळत आहे.
सूफी व अंजली या दोघींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विभक्त होण्याचा निर्णय सांगितला आहे. सुफीने केलेल्या फसवणुकीमुळे हे लग्न मोडत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुफीने न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगजवळ अंजलीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. फी आणि अंजली हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्याच वर्षी दोघींनी साखरपुडासुद्धा केला होता.
लग्नाच्या काही आठवडे आधी सुफीने अंजलीची फसवणूक केल्याची जाहीर कबुली दिली आहे. “अंजलीचा विश्वासघात करून मी खूप मोठी चूक केली आहे. लग्नाला काहीच आठवडे शिल्लक असताना मी तिला खूप दुखावलं आहे. मी माझी चूक कबूल करते आणि त्याची पूर्णपणे जबाबदारीही घेते” असं सुफीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तर दुसरीकडे अंजलीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित लग्न मोडल्याचं सांगितलं आहे. तसेच या पोस्टद्वारे तिने विश्वासघात केल्याप्रकरणी सुफीवर टीका करू नका, अशी नेटकऱ्यांना विनंतीही केली आहे.
आणखी वाचा – ‘रामायण’मधील राम म्हणजेच अरुण गोविल यांची वर्षभराची नेमकी कमाई किती?, भाजपामधून लोकसभा निवडणूकही लढवणार
सूफीच्या या कृतीमुळे ती सध्या नेटकऱ्यांच्या तावडीत सापडली आहे. एकाने सूफीची तुलना ‘पीके’ चित्रपटातील सरफराजबरोबर करत “तुला आधीच सांगितले होते की, सरफराज तुझी फसवणूक करणार” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “फक्त सरफराज नाही तर सुफीही फसवणूक करणार” असं म्हटलं आहे. तर अनेकांनी “लेस्बीयन जोडप्यांमध्येही लव्ह जिहाद होतं का? आणि पाकिस्तानमध्ये हे असं चालतं का?” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
आणखी वाचा – Video : चष्मामधून रवीना टंडन उडवत होती पाणी, अभिनेत्रीची भलतीच पिचकारी, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
दरम्यान, २०१९ मध्ये सूफी व अंजली त्यांच्या फोटोशूटमुळे चर्चेत आल्या होत्या. सुफी मलिक आणि अंजली चक्र यांची पहिली भेट कॅलिफोर्नियातील टम्बलरवर झाली होती. अंजली एक इव्हेंट प्लॅनर आहे, तर सुफी कलाकार आहे. सूफी ही पाकिस्तानी मुस्लीम असून अंजली भारतीय हिंदू आहे. पाच वर्षांहून जास्त काळ एकत्र घालविल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.