लहान पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. मालिकेतील दया ही भूमिका साकरणारी दिशा वकानी बाहेर पडल्यानंतर या मालिकेकडे प्रेक्षकांनी बऱ्यापैकी पाठ फिरवली होती. त्यामुळे ती परत मालिकेत येऊ शकते असे मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलेही होते मात्र अद्याप तसे झाले नाही. अशातच काही महिन्यांपूर्वी या मालिकेतील ‘मिसेस सोढी’ची भूमिका करणारी जेनिफर मिस्त्री बंसीवाल यांनी शारीरिक शोषण झाल्याबद्दलची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल आता समोर आला आहे. (jennifer mistri on asit kumar modi)
जेनिफर यांनी काही महिन्यांपूर्वी मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या मदतीने या प्रकरणाची कार्यवाही सुरु झाली होती. पण निकाल जेनिफर यांच्या बाजूने लागला तरीही असित यांना शिक्षा मिळाली नव्हती. या प्रकरणामध्ये असित यांच्याबरोबरच सोहेल रमानी व जतिन रमानी यांच्या विरोधातही शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. पण आता हा निकाल आला असून असित यांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्याने अभिनेत्रीने महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली होती. स्थानिक तक्रार समितीच्या गठनानंतर या प्रकरणाची कार्यवाही होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर असित यांना कामाच्या ठिकाणी माहिलांवर लैंगिक शोषण कायदा २०१३ अंतर्गत चार महिन्यात दोषी म्हणून घोषित झाले. या प्रकरणात जेनिफरने एका माध्यमाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, “हो , निकाल माझ्या बाजूने लागला आहे. मी जे आरोप केले आहेत त्याबद्दल माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मी निर्माते असित मोदी, ऑपरेशन हेड सोहिल रमाणी व एग्ज्यूक्युटीव्ह निर्माते जतिन बजाज यांच्या विरोधात शारीरिक शोषणाचे आरोप केला होता. पण मुंबई पोलिसांकडे विचारल्यानंतरही कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मी स्थानिक तक्रार समितिची मदत घेतली आणि निकाल लवकर लागला”.
पुढे त्या म्हणाल्या की, “मला हे सांगताना खूप दु:ख होते की पोलिस अधिकाऱ्यांनी गेल्या एका वर्षात काही करु शकले नाहीत. मी दिलेले सर्व पुरावे लक्षात घेऊन निकल माझ्या बाजुने लागला. असितना पांच लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. बाकी रक्कम त्यांनी दिली नव्हती. ही एकूण रक्कम २० ते २५ लाख इतकी आहे. शारीरिक शोषणाच्या आरोपासाठी त्यांना पाच लाख रुपयांचा अतिरिक्त दंड द्यावा लागला. हा निकाल १५ फेब्रुवारी २०२४ रोजी लागला. पण यावर काहीही भाष्य करण्यास बंदी घातली होती”.
दरम्यान या प्रकरणाची मनोरंजन क्षेत्रांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.