मनोरंजन विश्वातील जग्गू दादा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे जॅकी श्रॉफ. ‘राम लखन’, ‘खल नायक’, ‘देवदास’, ‘रंगिला’, ‘बॉर्डर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून जॅकी श्रोफ यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. अभिनेते आज मनोरंजनसृष्टीत फारसे सक्रिय नाहीत, पण त्यांच्या बद्दलच्या चर्चा आजही सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसून येतात.
मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांबद्दल काही घटना, प्रसंग किंवा किस्स्यांची चर्चा कायमच रंगत असते. असाच एक किस्सा अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याबद्दलचा आहे. जॅकी श्रॉफ यांनी एका पार्टीत अभिनेत्री तब्बूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तब्बूची बहीण व प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाजने याबद्दलचा खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊयात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं…
ही घटना १९८६ सालची आहे. तब्बूची बहीण फराह नाजने याबद्दल असं सांगितलं होतं की, “मी व माझी बहीण तब्बू अभिनेने डॅनी यांच्या घरी गेलो होतो. त्यादरम्यान फराह व जॅकी ‘दिलजले’ चित्रपटात एकत्र काम करत होते. त्यामुळे डॅनी यांच्या घरी पार्ट्या होत होत्या आणि तब्बू तिच्या बहिणीबरोबर तिथे गेली होती. त्यादिवशी पार्टीत जॅकीने खूप दारू प्यायला होता. त्यामुळे त्या रात्री त्याने दारूच्या नशेत तब्बूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तो किसही घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्या रात्री डॅनीने जॅकीला कसं तरी सांभाळले आणि मग आम्ही तिथून निघून आलो”.
फराहने एका मुलाखतीत हा खुलासा करताना सांगितले होते की, “डॅनी जर तब्बूला वाचवण्यासाठी पुढे आले नसते तर जॅकीने तब्बूला बदनाम करण्याचेच ठरवले होते. तब्बूने याबद्दल कधीही स्वत:हून कधीच जाहीरपणे सांगितलेले नाही. पण कदाचित तिने तेव्हा याबद्दल जर कडक पाऊल उचलले असते, तर आज जॅकी यांचे करिअर संपले असते”.
दरम्यान, फारच कमी लोकांना हे माहित असेल की, ८०-९०चं दशक गाजवणारी सुंदर अभिनेत्री फराहने तिच्या अनेक लोकप्रिय चित्रपट केले आहेत. ज्यात ‘यतिं फासले’, ‘काला बाजार’, ‘हलचल’, ‘नसीब अपना अपना’सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.