बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जळगावमध्ये धक्काबुक्कीदरम्यान भडकली रिंकू राजगुरु, व्हिडीओ व्हायरल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “माझा हात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 5, 2024 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rinku Rajguru Post

जळगावमध्ये धक्काबुक्कीदरम्यान भडकली रिंकू राजगुरु, व्हिडीओ व्हायरल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, "माझा हात..."

अभिनेत्री रिंकू राजगुरूने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सैराट या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामुळे रिंकूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आजवर रिंकूने अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. अत्यंत जिद्दीने व मेहनतीने रिंकूने सिनेसृष्टीतील तिचं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयशिवाय रिंकू मोठमोठ्या कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसते. (Rinku Rajguru Post)

अशातच रिंकू एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. रिंकूने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रिंकूने जळगांव येथे महासांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला अभिनेत्रीला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यान, रिंकूला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. या गर्दीचा फटका अभिनेत्रीला बसला असल्याचं समोर आलं आहे. रिंकूच्या भेटीसाठी चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या युट्युब चॅनेलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली पूजा सावंत, सिद्धीविनायकाचंही घेतलं दर्शन, गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं साऱ्यांचं लक्ष

अभिनेत्री कार्यक्रमातून बाहेर येत असताना जमलेल्या घोळक्याने रिंकूला धक्क्काबुक्की करण्यात आली. हे पाहताच अभिनेत्री संतापलेली पाहायला मिळाली. ‘या जागी जर तुमची मुलगी असती तर चाललं असतं का?’, असा थेट सवाल अभिनेत्रीने त्या गर्दीतच चाहत्यांना केला. सध्या रिंकूचा व्हिडीओ चर्चेत आला असून प्रसारमाध्यमांद्वारे अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. रिंकूचा हा व्हिडीओ योग्य असून तो चुकीच्या मार्गाने प्रेक्षकांसमोर दाखवण्यात आला असल्याचं मत रिंकूने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा – Video : बीचवर धमाल डान्स, नंतर गाडीतच डुलक्या अन्…; ऑस्ट्रेलियामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमचा धिंगाणा, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

रिंकूने या प्रकरणावरुन इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने म्हटलं आहे की, “जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत. नुकतंच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमा ठिकाणी अशी कोणतीच घटना घडली नसून माझा हात खेचल्यामुळे एका representative बरोबर मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास व प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती. तुमची रिंकू”, असं म्हणत अभिनेत्रीने अफवा पसरवल्या असं म्हणत स्वतःच मत मांडलं आहे.

Tags: entertainmentrinku rajguruRinku Rajguru Angryrinku rajguru postrinku rajguru viral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Jackie Shroff drunk and tried to kiss tabu actress sister Farah Naaz has disclosed

सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती, किस करण्याचा प्रयत्न अन्...; 'त्या' पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ यांनी दारु पिऊन केला होता धिंगाणा, तेव्हा काय घडलं होतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.