शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमात गाणारी रिहाना नेमकी आहे तरी कोण?, जगभरात रंगली चर्चा, तिची एकूण कमाई आहे तब्बल…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 1, 2024 | 2:07 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Rihanna net worth and income see the details singer performing in anant ambani radhika marchant wedding

अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमात गाणारी रिहाना नेमकी आहे तरी कोण?, जगभरात रंगली चर्चा, तिची एकूण कमाई आहे तब्बल...

उद्योजक मुकेश अंबानी यांचा लेक अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर बोहल्यावर चढणार आहे. त्यामुळे अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शन सुरु झाले आहे. अवघ्या देशाचे लक्ष या या शाही लग्नाकडे लागून राहिलं आहे. अनंत अंबानीच्या लग्नासाठी देशविदेशातून पाहून मंडळी जमा झाली आहेत. त्यामुळे जामनगरमध्ये अनेक पाहुण्यांची, कलाकारांची, राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

जामनगर येथे भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी जगभरातील अनेक पाहुण्यांना आमंत्रणे देण्यात आली आहेत. या पाहुण्यांच्या यादीत काही मोठ्या नावांचा समावेश आहे. भारतातील तसेच परदेशातील अनेक नामवंत व्यक्तींना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यातील एक मुख्य नाव सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे आणि ते नाव म्हणजे प्रसिद्ध हॉलिवूड गायिका आयकॉन रिहाना. ही जगातील सर्वात सर्वात श्रीमंत महिला संगीतकार आहे. त्यामुळे इतकी श्रीमंत व्यक्ती अंबानींच्या या सोहळ्यात सहभागी होणार असल्यामुळे साऱ्यांचेच लक्ष तिच्याकडे लागून राहिले आहे. चला तर जाणून घेऊयात ही रिहाना नेमकी आहे कोण?

View this post on Instagram

A post shared by RİHANNA (@rihannaofficiall)

आणखी वाचा – Video : अनंत अंबानीच्या लग्नासाठी राजकीय मंडळीही तयार, अमृता फडणवीसांच्या कपड्यांची रंगली सर्वाधिक चर्चा, ड्रेसिंग पाहून लोकही भडकले

रिहानाला आतापर्यंत तब्बल ०९ ग्रॅमी अवॉर्ड्स, १२ बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स, ०६ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले आहेत. अनेक सौंदर्यप्रसाधने ब्रँड व ‘फेंटी’ या तिच्या स्वत:च्या सौंदर्यप्रसाधक ब्रॅंडच्या यशामुळे तिची एकूण संपत्ती $१.४ अब्ज (अंदाजे ११,०००० रु. कोटी) पर्यंत आहे. त्यामुळे फोर्ब्सनुसार, रिहानाला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले जाते. रिहानाने तिच्या रेटेड आर अल्बमची जाहिरात करण्यासाठी २०१० मध्ये लास्ट गर्ल ऑन अर्थ टूरसह टूर करून लक्षणीय रक्कम कमावण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या ‘लास्ट गर्ल ऑन अर्थ टूर’, ‘लाऊड ​​टूर’, ‘डायमंड्स वर्ल्ड टूर’ यांसारख्या अनेक टूरमधून ती लाखों, करोडो रुपये कमावत असल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे रणवीर सिंह, गर्दीमध्ये अडकल्यानंतर त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

याबरोबरच ती सोशल मीडियाद्वारेही अनेक कमाई करते. रिहानाचे इन्स्टाग्रामवर १५२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. Hopper HQ नुसार, रिहानाने इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रायोजित पोस्टसाठी $९१४,००० (अंदाजे ७ कोटी रुपये) शुल्क आकारत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, ती Spotifyद्वारे सुमारे $९७,००० (अंदाजे ८० लाख रुपये) कमावते.

Tags: anant ambaniAnant Ambani Radhika Merchant Weddingbollywood newsentertainment newsPop Singerradhika merchantRihannaअनंत अंबानीअनंत अंबानी राधिका मर्चंट लग्नपॉप गायिकाबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीराधिका मर्चंटरिहाना
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Dharmendra Viral Photo

पायाला जखम, हातात शिळी भाकरी अन्…; धर्मेंद्र यांची उतरत्या वयात झालेली अवस्था पाहून सगळेच चक्रावले, अशा परिस्थितीमध्ये का राहत आहे अभिनेता?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.