उद्योजक मुकेश अंबानी यांचा लेक अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर बोहल्यावर चढणार आहे. त्यामुळे अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शन सुरु झाले आहे. अवघ्या देशाचे लक्ष या या शाही लग्नाकडे लागून राहिलं आहे. अनंत अंबानीच्या लग्नासाठी देशविदेशातून पाहून मंडळी जमा झाली आहेत. त्यामुळे जामनगरमध्ये अनेक पाहुण्यांची, कलाकारांची, राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
जामनगर येथे भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी जगभरातील अनेक पाहुण्यांना आमंत्रणे देण्यात आली आहेत. या पाहुण्यांच्या यादीत काही मोठ्या नावांचा समावेश आहे. भारतातील तसेच परदेशातील अनेक नामवंत व्यक्तींना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यातील एक मुख्य नाव सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे आणि ते नाव म्हणजे प्रसिद्ध हॉलिवूड गायिका आयकॉन रिहाना. ही जगातील सर्वात सर्वात श्रीमंत महिला संगीतकार आहे. त्यामुळे इतकी श्रीमंत व्यक्ती अंबानींच्या या सोहळ्यात सहभागी होणार असल्यामुळे साऱ्यांचेच लक्ष तिच्याकडे लागून राहिले आहे. चला तर जाणून घेऊयात ही रिहाना नेमकी आहे कोण?
रिहानाला आतापर्यंत तब्बल ०९ ग्रॅमी अवॉर्ड्स, १२ बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स, ०६ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले आहेत. अनेक सौंदर्यप्रसाधने ब्रँड व ‘फेंटी’ या तिच्या स्वत:च्या सौंदर्यप्रसाधक ब्रॅंडच्या यशामुळे तिची एकूण संपत्ती $१.४ अब्ज (अंदाजे ११,०००० रु. कोटी) पर्यंत आहे. त्यामुळे फोर्ब्सनुसार, रिहानाला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले जाते. रिहानाने तिच्या रेटेड आर अल्बमची जाहिरात करण्यासाठी २०१० मध्ये लास्ट गर्ल ऑन अर्थ टूरसह टूर करून लक्षणीय रक्कम कमावण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या ‘लास्ट गर्ल ऑन अर्थ टूर’, ‘लाऊड टूर’, ‘डायमंड्स वर्ल्ड टूर’ यांसारख्या अनेक टूरमधून ती लाखों, करोडो रुपये कमावत असल्याचे म्हटले जाते.
याबरोबरच ती सोशल मीडियाद्वारेही अनेक कमाई करते. रिहानाचे इन्स्टाग्रामवर १५२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. Hopper HQ नुसार, रिहानाने इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रायोजित पोस्टसाठी $९१४,००० (अंदाजे ७ कोटी रुपये) शुल्क आकारत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, ती Spotifyद्वारे सुमारे $९७,००० (अंदाजे ८० लाख रुपये) कमावते.