शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : धमाकेदार एन्ट्री घेत तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा भन्नाट डान्स, साध्या लूकमध्ये दिसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 28, 2024 | 10:49 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Titeeksha Tawde and Siddharth Bodke's entry video is going viral on social media

धमाकेदार एन्ट्री घेत तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा भन्नाट डान्स, साध्या लूकमध्ये दिसले अन्...; व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुकगी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशातच अभिनेत्रीच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे, तो म्हणजे तितीक्षा तावडेचं नुकतंच लग्न पार पडलं आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर तितीक्षाने विवाहगाठ बांधली आहे.  तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी शाही थाटामाटात तितीक्षा व सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले आहेत. 

लग्नासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर या साडीला साजेसा असा पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊजही परिधान केला होता. तर सिद्धार्थने तितीक्षाच्या लूकला साजेसा असा ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता व त्यावर धोतर परिधान केला होता. त्यांचा हा खास लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडला. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – तब्बल २५ शेफ अन् २५०० पदार्थ; अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधींमधील खाद्यपदार्थ ठरणार लक्षवेधी

अशातच तितीक्षा-सिद्धार्थचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या एन्ट्रीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षाने लाल रंगाची साडी परिधान केली असून त्यावर तिने मोती रंगाची शाल घेतली आहे, तर सिद्धार्थने डिझाईनर कुर्ता पायजमा परिधान केला असून त्यावर त्यानेही शाल घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये दोघांच्या आजूबाजूला आकर्षक रोषणाई व फटक्यांची आतिषबाजीही केली असल्याचे पाहायला मिळत आहे.  

आणखी वाचा – “विकीला लग्न करायचे नव्हते”, अंकिता लोखंडेचा नवऱ्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “त्याने बिलासपूरमधील…”

या व्हिडीओमध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत असून एकमेकांबरोबर त्यांनी खास ठेकाही धरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर  चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांना तितीक्षा-सिद्धार्थ ही जोडी आवडली असून अनेकांनी त्यांना त्यांच्या नवीन लग्नासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.      

Tags: entertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainment newsMarathi newsMarriage Newssiddharth bodketiteeksha tawdeTitiksha Tawde Siddharth Bodke Marriageतितीक्षा तावडेतितीक्षा तावडे सिद्धार्थ बोडके लग्नमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीसिद्धार्थ बोडके
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Taapsee Pannu Wedding

तापसी पन्नूची लगीनघाई! 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा, बॉलिवूड कलाकारांना निमंत्रण नसल्याचं आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.