‘बिग बॉस १७’मध्ये चर्चेत आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. अंकिता व विकी यांनी कपल एंट्री करत यंदाचं पर्व विशेष गाजवलं. ‘बिग बॉस’च्या घरात आल्या दिवसापासून ही जोडी चर्चेत राहिली. सततचे वाद, भांडण तर कधी रोमँटिक अंदाज यांमुळे अंकिता व विकी चर्चेत आले. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरही ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लक्ष वेधून घेत आहे. अशातच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये अंकिताने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. अंकिताने तिच्या नवऱ्याबाबतचा एक खुलासा केला आहे. (Ankita Lokhande And Vicky Jain)
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक धक्कादायक दावा केला आहे. अंकिताने सांगितले की, विकीला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. सुरुवातीला विकीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. अंकिता या विषयावर भाष्य करत असताना तिचा पती विकी जैनही तिच्याबरोबर उपस्थित होता. अंकिताच्या बोलण्यावर विकीने प्रतिक्रिया दिली आणि त्यामागचे कारण सांगितले.
भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये अंकिता म्हणाली, “त्याने सांगितले की मी लग्न करू शकत नाही आणि तिथून तो निघून गेलो. त्याने असे सांगितले कारण आमची जीवनशैली खूप वेगळी होती. तो बिलासपूरमध्ये राहत होता आणि मी मुंबईत राहत होते. त्यामुळे त्याला वाटले की त्याने बिलासपूरमधील मुलीशी लग्न करावे”. अंकिताच्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विकी म्हणाला, “अंकिताने मला कधीच बोलण्याची संधी दिली नाही, त्यामुळे मी बोलू शकलो नाही. मला असे वाटते की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. आम्ही भेटलो तेव्हा अंकिताची अशीच परिस्थिती होती. तिने लग्न करावे अशी माझी इच्छा होती. आणि मी त्या स्थितीत नव्हतो”.
विकीच्या आईचाही या लग्नाला विरोध होता. पिंकविलाशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, “अंकिताशी लग्न करणारा विकी आहे. आम्ही कोणाच्याही समर्थनात नव्हतो. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. हे सगळं बघून आम्ही त्याला काहीच बोलत नाही. आता तो येऊन त्यांचे संबंध सुधारेल. जर त्याने गडबड केली असेल तर तोच त्यात सुधारणा करेल आणि आमचा विकीवर विश्वास आहे”, असं त्या म्हणाल्या.