सध्या अंबानी कुटुंबात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकट्या लेकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नापुर्वीच्या विधींची लगबग सुरु झाली आहे. १ ते ३ मार्चदरम्यान गुजरातमधील जामनगर येथे लग्नापूर्वीचे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडणार असल्याचं समोर आलं आहे. या खास सोहळ्यासाठी खाद्यपदार्थांची मेजवानी खूप खास असणार आहे. त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधी व पाहुणे मंडळींच्या आमंत्रणाबाबत काही माहिती समोर आली आहे. त्यानुसार बी-टाऊनचे अनेक मोठे कलाकार या जोडप्याच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. (Ambani Family Wedding)
अनंत व राधिकाच्या लग्नापुर्वीच्या विधीचा जेवणाचा मेनूही समोर आला आहे. रिपोर्ट्सनुसार, यासाठी २५ हून अधिक शेफची खास टीम इंदौरहून जामनगरला पोहोचली आहे. या मेनूमध्ये इंदोरी खाद्यपदार्थांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच पारशी ते थाई, मेक्सिकन व जपानी तसेच पॅन-एशियन खाद्यपदार्थांचाही यांत समावेश असेल.
तीन दिवस चालणाऱ्या राधिका व अनंतच्या लग्नाच्या फंक्शनच्या फूड मेनूमध्ये २,५०० पदार्थांचा समावेश असणार आहे. यानुसार, पाहुण्यांना नाश्त्यामध्ये ७०हून अधिक पर्याय दिले जातील. तर जेवणासाठी २५० हून अधिक पर्याय आणि रात्रीच्या जेवणासाठी २५० हून अधिक पर्याय असतील. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी व्हेज जेवणाचीही खास व्यवस्था आहे. या मेजवानीची खास गोष्ट म्हणजे पाहुण्यांसाठी अर्ध्या रात्रीचा नाश्ता उपलब्ध असेल.
अनंत व राधिकाच्या लग्नापुर्वीच्या विधींमध्ये पाच कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांसाठी सुमारे १,००० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यात बिल गेट्स, मेलिंडा गेट्ससारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूडमधीलही दिग्गज मंडळी व कलाकार यांना आमंत्रित कऱण्यात आले असून कलाकार मंडळी या कार्यक्रमासाठी जामनगरला रवाना झालेले पाहायला मिळत आहेत.