मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तापसी पन्नूची लगीनघाई! ‘या’ ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा, बॉलिवूड कलाकारांना निमंत्रण नसल्याचं आलं समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2024 | 11:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Taapsee Pannu Wedding

तापसी पन्नूची लगीनघाई! 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा, बॉलिवूड कलाकारांना निमंत्रण नसल्याचं आलं समोर

सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच रकुल प्रीत सिंह व जॅकी भगनानी यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. रकुल व जॅकी यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तापसी पन्नूही तिच्या लग्नाच्या तयारीला लागली असल्याची बातमी समोर आली आहे. (Taapsee Pannu Wedding)

तापसीच्या लग्नासंबंधित काही अपडेट समोर आले आहेत. समोर आलेल्या अपडेटमध्ये अभिनेत्री कुठे लग्न करणार याचा खुलासा केला आहे. लवकरच अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड व बॅडमिंटनपटू मॅथियास बो याच्यासह लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही यावर्षी मार्चमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या लग्नाला फक्त तापसी व मथियाचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. समोर आलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या लग्नासाठी अद्याप आमंत्रित करण्यात आलेले नाही. तापसीचे लग्न शीख व ख्रिश्चन रितीरिवाजानुसार होणार आहे.

आणखी वाचा – Video : धमाकेदार एन्ट्री घेत तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा भन्नाट डान्स, साध्या लूकमध्ये दिसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसी तिच्या बॉयफ्रेंडसह सुमारे १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता त्यांनी २०२४मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार तापसीने तिच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली आहे. राजस्थान येथे शाही पद्धतीने त्यांचं लग्न होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ व कियारा अडवाणी या अभिनेत्रींनीही त्यांच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली होती.

आणखी वाचा – तब्बल २५ शेफ अन् २५०० पदार्थ; अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधींमधील खाद्यपदार्थ ठरणार लक्षवेधी

अद्याप तापसीकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तापसीने तिच्या प्रियकराबरोबरचे नाते कधीच लपवले नाही उलट ती प्रत्येकवेळी त्याच्याबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावरून पोस्ट करत असते. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टीतीलही प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने मॉडेलिंगपासून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. तापसीने ‘जुडवा 2’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ व ‘शाबाश मिठू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tags: entertainmententertainment gossipTaapsee PannuTaapsee Pannu boyfriendTaapsee Pannu Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Anant Ambani and Radhika Marchant pre-wedding function

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांची खास उपस्थिती, जान्हवी कपूर पोहोचली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.