छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुकगी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशातच अभिनेत्रीच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे, तो म्हणजे तितीक्षा तावडेचं नुकतंच लग्न पार पडलं आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर तितीक्षाने विवाहगाठ बांधली आहे. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी शाही थाटामाटात तितीक्षा व सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले आहेत.
लग्नासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर या साडीला साजेसा असा पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊजही परिधान केला होता. तर सिद्धार्थने तितीक्षाच्या लूकला साजेसा असा ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता व त्यावर धोतर परिधान केला होता. त्यांचा हा खास लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडला. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अशातच तितीक्षा-सिद्धार्थचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या एन्ट्रीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षाने लाल रंगाची साडी परिधान केली असून त्यावर तिने मोती रंगाची शाल घेतली आहे, तर सिद्धार्थने डिझाईनर कुर्ता पायजमा परिधान केला असून त्यावर त्यानेही शाल घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये दोघांच्या आजूबाजूला आकर्षक रोषणाई व फटक्यांची आतिषबाजीही केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “विकीला लग्न करायचे नव्हते”, अंकिता लोखंडेचा नवऱ्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “त्याने बिलासपूरमधील…”
या व्हिडीओमध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत असून एकमेकांबरोबर त्यांनी खास ठेकाही धरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांना तितीक्षा-सिद्धार्थ ही जोडी आवडली असून अनेकांनी त्यांना त्यांच्या नवीन लग्नासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.