शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विराट कोहली व अनुष्का शर्माने लेकाचं नाव ठेवलं ‘अकाय’, हे नाव ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय?, नावाचा अर्थ आहे…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 21, 2024 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Virat kohli anushka sharma blessed with baby boy what is the meaning of akaay name see the details

विराट कोहली व अनुष्का शर्माने लेकाचं नाव ठेवलं ‘अकाय’, हे नाव ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय?, नावाचा अर्थ आहे...

गेले काही दिवस हिंदी मनोरंजन विश्वातून अनेक आनंदवार्ता समोर येत आहेत. कुणी एकमेकांशी विवाहगाठ बांधत आहेत. तर कुणी आई-बाबा झाले आहेत. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू विराट कोहली व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच आई-बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. काल (२० फेब्रुवारी) रोजी विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.  

१५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी विरुष्काने ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “खूप आनंदाने व प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे ‘अकाय’ म्हणजेच वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले! आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा”.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई-बाबा झाले विराट कोहली व अनुष्का शर्मा, अभिनेत्रीने मुलाला दिला जन्म, नाव ठेवलं…

विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच त्यांच्या या नवीन बाळाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विराट-अनुष्का यांच्या बाळाच्या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘अकाय’ हा मुळात संस्कृत शब्द आहे, जो विशेषण म्हणून वापरला जातो. ‘अकाय’ या नावाचा एक अर्थ ‘तेजस्वी’ किंवा ‘चमकणारा चंद्र’ असा होतो. तर दूसरा अर्थ म्हणजे ‘निराकार’ असा होतो. ‘निराकार’ म्हणजे ज्याला कोणताही स्थिर आकार नाही. असा ‘निराकार’.

आणखी वाचा – सासूबाईंबरोबर एक-एक तास फोनवर बोलते मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकरलाही वाटलं आश्चर्य, म्हणाला, “लग्नानंतर आईचं आयुष्य…”

दरम्यान, विराट-अनुष्का यांनी आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ असं ठेवलं होतं. तेव्हादेखील वामिकाच्या नावाची अशीच चर्चा रंगली होती. ‘वामिका’ या नावाचा अर्थ दुर्गा देवी असा होतो. दुर्गा देवीच्या दुसऱ्या रुपाला ‘वामिका’ असं म्हंटलं जातं. दरम्यान, विराट-अनुष्का यांनी आपल्या मुलांची नावे अर्थपूर्ण ठेवली असून त्यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या या दुसऱ्या अपत्याबद्दलही अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: anushka sharmabollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsIndian cricketerVirat Anushkavirat kohliVirat Kohli and Anushka Sharmaअनुष्का शर्माबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीभारतीय क्रिकेटपटूमनोरंजन बातमीविराट अनुष्काविराट कोहली
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Divya Agarwal And Apurv Padgaonkar Wedding

अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; दिव्या अग्रवाल-अपूर्व पाडगांवकर यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.