गेले काही दिवस हिंदी मनोरंजन विश्वातून अनेक आनंदवार्ता समोर येत आहेत. कुणी एकमेकांशी विवाहगाठ बांधत आहेत. तर कुणी आई-बाबा झाले आहेत. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू विराट कोहली व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच आई-बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. काल (२० फेब्रुवारी) रोजी विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
१५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी विरुष्काने ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “खूप आनंदाने व प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे ‘अकाय’ म्हणजेच वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले! आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा”.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई-बाबा झाले विराट कोहली व अनुष्का शर्मा, अभिनेत्रीने मुलाला दिला जन्म, नाव ठेवलं…
विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच त्यांच्या या नवीन बाळाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विराट-अनुष्का यांच्या बाळाच्या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘अकाय’ हा मुळात संस्कृत शब्द आहे, जो विशेषण म्हणून वापरला जातो. ‘अकाय’ या नावाचा एक अर्थ ‘तेजस्वी’ किंवा ‘चमकणारा चंद्र’ असा होतो. तर दूसरा अर्थ म्हणजे ‘निराकार’ असा होतो. ‘निराकार’ म्हणजे ज्याला कोणताही स्थिर आकार नाही. असा ‘निराकार’.
दरम्यान, विराट-अनुष्का यांनी आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ असं ठेवलं होतं. तेव्हादेखील वामिकाच्या नावाची अशीच चर्चा रंगली होती. ‘वामिका’ या नावाचा अर्थ दुर्गा देवी असा होतो. दुर्गा देवीच्या दुसऱ्या रुपाला ‘वामिका’ असं म्हंटलं जातं. दरम्यान, विराट-अनुष्का यांनी आपल्या मुलांची नावे अर्थपूर्ण ठेवली असून त्यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या या दुसऱ्या अपत्याबद्दलही अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.