शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्यांदा आई-बाबा झाले विराट कोहली व अनुष्का शर्मा, अभिनेत्रीने मुलाला दिला जन्म, नाव ठेवलं…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 21, 2024 | 9:22 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Virat Kohli and Anushka Sharma shared the news of their baby boy through social media

दुसऱ्यांदा आई-बाबा झाले विराट कोहली व अनुष्का शर्मा, अभिनेत्रीने मुलाला दिला जन्म, नाव ठेवलं...

क्रिकेट जगतातुन नुकतीच एक आनंदवार्ता समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय व प्रसिद्ध चेहरा क्रिकेटपटू विराट कोहलीला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. गेले काही दिवस विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू होती. तेव्हापासून विराटसह अनुष्काच्या चाहत्यांना नवीन पाहुण्याची चाहूल लागली होती. अशातच काल (२० फेब्रुवारी) रोजी विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

१५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी विरुष्काने ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “खूप आनंदाने व प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे ‘अकाय’ म्हणजेच वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले! आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा मागत आहोत. यादरम्यानच्या काळात आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करावा.”

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

आणखी वाचा – PSL सामना पाहण्यासाठी आलेल्या शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला सानिया मिर्झाच्या नावाने लोकांनी डिवचलं, चेहऱ्यावर राग अन्…; व्हिडीओ व्हायरल

तसेच यापुढे विराट-अनुष्का यांनी चाहत्यांप्रती प्रेम व कृतज्ञतादेखील व्यक्त केली आहे. विराट-अनुष्का यांनी ही गोडी बातमी देताच त्यांच्यावर अनेक कलाकार, खेळाडू तसेच असंख्य चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. चाहत्यांनी या पोस्टखाली कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच त्यांच्या या नवीन बाळाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विराट-अनुष्का यांच्या बाळाच्या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आणखी वाचा – सासूबाईंबरोबर एक-एक तास फोनवर बोलते मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकरलाही वाटलं आश्चर्य, म्हणाला, “लग्नानंतर आईचं आयुष्य…”

दरम्यान, विराट-अनुष्का यांनी २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी त्यांची पहिली मुलगी ‘वामिका’ला जन्म दिला. त्यानंतर आता फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. विराटने केलेल्या पोस्टवर चाहत्यांसह मनोरंजन आणि क्रिडा विश्वातील अनेकांनी कमेंट ‘विरुष्का’चे अभिनंदन केले. कोहली कुटुंबातील या नव्या सदस्याचे स्वागत करण्यासाठी काहीच मिनिटांत लाखो कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत.

Tags: anushka sharmabollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsIndian cricketerVirat Anushkavirat kohliVirat Kohli and Anushka Sharma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Virat kohli anushka sharma blessed with baby boy what is the meaning of akaay name see the details

विराट कोहली व अनुष्का शर्माने लेकाचं नाव ठेवलं ‘अकाय’, हे नाव ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय?, नावाचा अर्थ आहे...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.