कलर्स वरील बिग बॉस हा शो नेहमीच चर्चेत राहणारा शो आहे. निग बॉसचा यंदाचा १७वा सीझन तर घरातील स्पर्धकांच्या एकमेकांमधील वाद, भांडणं व मारामारी यांमुळे चांगलाच चर्चेत राहिला आहे. अशातच आता या शोच्या अंतिम सोहळ्यासाठी काही दिवसच उरले आहेत. या घरात मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार व अरुण महाशेट्टी हे चार स्पर्धकच उरले आहेत.
गेल्या आठवड्यात या घरातून विकी जैन व त्याच्या आधी ईशा मालवीय गहरातून बाहेर पडली. कमी मतं मिळाल्यामुळे तिला या घरातून बाहेर पडावे लागले. घरातून बाहेर पडताच ईशा मुलाखती देत आहे. या मुलाखतींमध्ये ईशा अनेक मुद्द्यांवर स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. अशाच एका मुलाखतीत ईशाने ऐश्वर्या शर्मावर वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ऐश्वर्यानेही ईशाच्या त्या वक्तव्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ईशा मालवीयचे नाव न घेत असे म्हटले आहे की, “बिग बॉसची तथाकथित स्पर्धक असे म्हणत आहे की, “बिग बॉस ही एक स्पर्धा होती. त्यामुळे या घरात मला तिला घरातून काढून टाकण्याची शक्ती मिळताच मी तिला काढून टाकले. तसंही ऐश्वर्याचे या घरात काहीच योगदान नव्हते. तसेच तिने ‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली स्पेशल भागात तिच्या वडिलांसमोर अनुरागच्या चाहत्यांबाबतदेखील एक वक्तव्य केले होते आणि ती या मुलाखतीत अमान्य करत आहे. म्हणजे तुला नक्की म्हणायचं तरी काय आहे?”
तसेच या पोस्टमध्ये ऐश्वर्याने असं म्हटलं आहे की, “बिग बॉस’च्या घरातील योगदानाबद्दल बोलायचे झाले तर ईशाने स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चा करणे, भांडणं लावणे व सतत अभिषेकच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे मूर्ख हा नेहमीच मूर्ख असतो.”