Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा शाही विवाहसोहळा उरकल्यानंतर दोघंही विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले. आमचं ठरलं म्हणत सोशल मीडियावरुन जाहीर प्रेमाची कबुली देत या जोडीने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर या जोडीने पारंपरिक अंदाजात त्यांचा शाही विवाहसोहळा उरकला. दोघांच्या लग्नसोहळ्याचंही सर्वत्र कौतुक झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसले.
मुग्धा व प्रथमेश दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्याचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. एकत्र फिरतानाचे वा एकत्र कार्यक्रम करतानाचे अनेक व्हिडीओ ते सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर करतात. दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनादेखील चांगलीच भावते. लग्नानंतर ही जोडी कामाला लागली आहे. दोघांनी त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांना सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. याची सुरुवात प्रथमेशच्या गावी दत्त जयंती निमित्त सुरु असलेल्या कार्यक्रमावेळी गाणं गात केली.
सध्या मुग्धा गायनाच्या कार्यक्रमासाठी अंदमान येथे गेली असल्याचं समोर आलं आहे. मुग्धा अंदमान येथील अनेक व्हिडीओ, फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत आहे. मुग्धाने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये प्रथमेशला ती मिस करत असल्याचं तिने म्हटलं आहे. याचबरोबर तळटीप म्हणून “मला माहित आहे हे मिसिंग प्रकरण जरा जास्त होत आहे असं तुम्हा सगळ्यांना वाटेल पण काय करणार” असं म्हणत तिने प्रथमेशला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. मुग्धाची ही स्टोरी रिपोस्ट करत प्रथमेशने तो ही मुग्धाला मिस करत असल्याचं त्याने म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी प्रथमेशने त्याच्या एकट्याचा फोटो पोस्ट करत त्याला मुग्धाची आठवण येत असल्याचे म्हटलं होत. प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याचा सेल्फी शेअर केला होता. या फोटोखाली त्याने “खूप आठवण येत आहे” असं म्हणत मुग्धाला ही स्टोरी टॅग केलेली पाहायला मिळाली. दरम्यान त्यावेळी प्रथमेश एका कार्यक्रमानिमित्त इंदोरला गेला होता. या त्याच्या इंदोरच्या प्रवासात त्याच्याबरोबर मुग्धा नसल्याने त्याला तिची आठवण येत असल्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या.